OTT हें ना! बोल्ड सीनमुळे थिएटरनी धुडकावलं; पण 'या' प्लॅटफॉर्मवर पाहू शकता हे 5 चित्रपट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
असे अनेक चित्रपट आहेत जे बोल्ड सीनमुळे थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकले नाहीत. मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मचं क्रेझ सुरू झालं तेव्हा या चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्थान मिळालं. आज अशा 5 चित्रपटांबद्दल जाणून घेऊया जे त्यांच्या बोल्ड विषयांमुळे वादात राहिले.
advertisement
गार्बेज - कौशिक मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित हा ड्रामा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झाला होता, यात त्रिमाला अधिकारी, तन्मय धनानिया, श्रुती विश्ववन, सतरूपा दास आणि सचित पुराणिक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अत्यंत बोल्ड कंटेंटमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही, परंतु आता तो नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे.
advertisement
फायर - मेहता यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा इंडो-कॅनेडियन रोमँटिक ड्रामा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला, ज्यामध्ये शबाना आझमी आणि नंदिता दास यांनी भूमिका केल्या होत्या. समलैंगिक संबंधांवर आधारित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली होती, त्यानंतर चित्रपटगृहांमध्ये त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं होतं. मात्र आता हा चित्रपट यूट्यूब किंवा इतर काही वेबसाईटवर ऑनलाइन पाहता येईल, फक्त पाहताना गोपनीयतेची काळजी घ्या.
advertisement
अँग्री इंडियन गॉडेसेस - जंगल बुक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली पान नलिन दिग्दर्शित आणि गौरव धिंग्रा आणि पान नलिन निर्मित हा ड्रामा चित्रपट 2015 साली प्रदर्शित झाला. 2015 टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या विशेष सादरीकरण विभागात प्रदर्शित करण्यात आलं होतं, जिथे ते पीपल्स चॉईस अवॉर्डसाठी दुसऱ्या स्थानावर होते. या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर लगेचच वाद सुरू झाला. बोल्ड कंटेंटमुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही, परंतु आता तो इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि तुम्ही तो OTT वरही पाहू शकता.
advertisement
पांच: अनुराग कश्यप लिखित आणि दिग्दर्शित हा क्राइम थ्रिलर चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे याला चित्रपटगृहात स्थान मिळू शकले नाही. केके मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य, जॉय फर्नांडिस आणि तेजस्विनी कोल्हापुरे अभिनीत हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म मुबी अॅपवर उपलब्ध आहे.
advertisement
अन-फ्रीडम - राज अमित कुमार दिग्दर्शित हा चित्रपट 2014 साली 'केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये दाखवण्यात आला होता, परंतु भारतात चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊ शकला नाही. हा चित्रपट समलैंगिक संबंधांवर आधारित होता. आता या चित्रपटाला OTT प्लॅटफॉर्म Netflix वर पाहू शकता.