सलमान खान गायब?
सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नसल्याने त्याचे चाहते मात्र दुखावले गेले आहेत. सलमान सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मंगळवारी भाईजान 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लडाखला रवाना झाला. आता पुढचे काही दिवस भाईजान लडाखमध्ये आगामी चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. त्यामुळे या आठवड्यात स्पर्धकांची शाळा घेताना सलमान दिसणार नाही.
advertisement
'माझं लग्न झालंय...', सलमान खानने स्वतः सांगितली होती त्याच्या लग्नाची तारीख, म्हणाला...
कोण करणार होस्ट?
'बिग बॉस 19'चा आगामी 'वीकेंड का वार' 13 आणि 14 सप्टेंबरला पार पडणार आहे. हा वीकेंड का वार अक्षय कुमार आणि अरशद वारसी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होस्ट करताना दिसून येतील. स्पर्धकांना ही बाब कळल्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील हे पाहावे लागेल.
अरशद वारसीने 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनचं होस्ट केलं होतं. आता पुन्हा एकदा या सेटवर कमबॅक करण्यासाठी तो सज्ज आहे. आगामी भागात सलमान खान आणि अरशद वारसी आपल्या आगामी 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसून येतील. 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सलमान खान 'बॅटल ऑफ गलवान'च्या पहिल्या शेड्युलमध्ये अनेक धमाकेदार सीन करत असल्याचं याआधी समोर आलं होतं. या चित्रपटात चित्रागंदा सिंहदेखील झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 'बिग बॉस' आणि सलमान खानचा एक मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंतचे सर्व सीझन सुपरहिट झाले आहेत. सलमान आपल्या हटके स्टाईलने सदस्यांची शाळा घेत असतो. आगामी सीझनकडूनही आता चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दरम्यान भाईजानच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. नुकतीच भाईजानने या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.