दरम्यान, नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार प्रणीत मोरेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. घरात सुरू असलेला गोंधळ आणि वादविवादांनंतर आता प्रणित मोरे हा यंदाच्या आठवड्यात बिग बॉसच्या १९ व्या पर्वाचा नवा कॅप्टन बनला आहे. विशेष म्हणजे, गौरव खन्ना, आश्णूर कौर, अभिषेक बजाज आणि मालती चहर या चार सदस्यांनी प्रणितला कॅप्टन बनवण्यासाठी जबरदस्त कामगिरी केली.
advertisement
कॅप्टन्सी टास्कच्या वेळी सदस्यांमध्ये जुंपली
कॅप्टन्सी टास्क सुरू झाल्याची घोषणा एका विशिष्ट आवाजाने झाली. हा टास्क शेहबाज आणि प्रणित या दोन उमेदवारांमध्ये होता. या दोघांना वगळता घरातील इतर सदस्यांनी या टास्कमध्ये भाग घ्यायचा होता. टास्कच्या नियमानुसार, प्रत्येक आवाजासोबत एका स्लाईडमधून तीन बॉल खाली पडायचे, पण यापैकी फक्त एकाच बॉलवर संख्या लिहिलेली असायची. ज्या सदस्याला हा संख्या असलेला बॉल मिळेल, त्याला तीन पर्याय होते, ते म्हणजे १. तो बॉल शेहबाजला देणे. २. तो बॉल प्रणितला देणे. ३. तो बॉल रेशन बोर्डवर ठेवणे.
टास्कच्या शेवटी, ज्याच्या बोर्डवर सर्वाधिक संख्यांची बेरीज असेल, तो सदस्य कॅप्टन बनेल, तर रेशन बोर्डवर जमा झालेल्या संख्यांवरून त्या आठवड्याचे रेशन ठरणार होते.
प्रणितच्या बाजूनं वळला खेळ
या टास्कमध्ये घरातील काही सदस्यांनी प्रणितला कॅप्टन बनवण्याचा निश्चित निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट दिसले. पहिल्या फेरीत गौरव खन्नाला '३' ही संख्या असलेला बॉल मिळाला आणि त्याने तो कोणताही विचार न करता तो बॉल प्रणितला दिला.
दुसऱ्या फेरीत अश्नूर कौरच्या हाती '५' ही संख्या आली आणि तिनेही तो बॉल प्रणितच्या बोर्डवर ठेवला. तिसऱ्या फेरीत अभिषेक बजाजने '५' चा बॉल मिळवला आणि त्यानेही तो प्रणितकडे दिला. चौथ्या फेरीत मालती चहरने '८' या सर्वाधिक संख्येचा बॉल मिळवला आणि तिनेही क्षणाचाही विलंब न करता तो प्रणितच्या पारड्यात टाकला.
या चारही फेऱ्यांमध्ये मिळालेले महत्त्वाचे अंक प्रणितला मिळाल्याने त्याची एकूण संख्या वाढली आणि शेवटी प्रणित मोरे हा बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन म्हणून जाहीर झाला. आता कॅप्टन म्हणून प्रणित घरात कोणता नवा खेळ खेळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
