कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीला सलमान खान स्टेजवर एल्विश यादवचे उत्साहाने स्वागत करतो. "जा आणि एकदम सिस्टीम हँग करून टाक!" असे सांगून सलमान त्याला घरात पाठवतो.
एल्विश यादव बिग बॉस १९ ची सिस्टम हँग करणार
घरात जाताच एल्विश यादव सगळ्यांत आधी प्रणितची मजा घेतो. तो प्रणितला स्टोर रूममधून काही वस्तू आणायला सांगतो. या वस्तूंमध्ये भरलेल्या इंजेक्शनचा समावेश असतो. या खास टास्कबद्दल बोलताना एल्विश सांगतो की, हे 'अँटीडोट' कार्य आहे. स्पर्धकांनी अशा एका स्पर्धकाचे नाव घ्यायचे आहे, ज्याच्यात खूप विष भरलेले आहे आणि त्या व्यक्तीतील विष तुम्हाला कमी करायचे आहे.
advertisement
या कार्यासाठी सर्वात आधी जीशान कादरीला बोलावले जाते. तो कुनिका सदानंदला अँटीडोट देतो आणि म्हणतो, "या घरात जर १०० मुद्दे असतील, तर त्यापैकी ९५ मध्ये कुनिकाजी असतात." हे ऐकून घरातील इतर स्पर्धकांसह कुनिकालाही हसू आवरत नाही.
यानंतर अभिषेक बजाजची पाळी येते. अभिषेक म्हणतो, "विष आणि फरहानाचा उल्लेख झाला नाही, असे होऊच शकत नाही." हे ऐकून फरहानाला वाटते की, अभिषेक आपल्याला अँटीडोट देणार आणि ती त्याच्याकडे चालत येते. पण अभिषेक तिला म्हणतो, "तुझे नाव घेणार नाही, तू परत जा!"
यानंतर अमाल मलिक अशनूर कौरला अँटीडोट देतो, कारण ती ग्रुपची लीडर असल्याचे तो सांगतो. अमालचे बोलणे ऐकून एल्विश यादव बाजूला हसून म्हणतो, "हिला तर कितीही उतारा दिला, तरी हे विष काही संपणार नाहीये!" याशिवाय, नेहालन जीशानला, मृदुल तान्याला, प्रणित मोरे बशीरला आणि फरहाना अभिषेक बजाजला अँटीडोट देताना दिसतील. एल्विशच्या एंट्रीमुळे घरात एक मोठा गोंधळ आणि धमाल होणार हे निश्चित आहे.