'बुरी नझरवाले तेरा मुह काला!', चहलवरून ट्रोल करणाऱ्या समय रैनाला धनश्री वर्माचं सणसणीत उत्तर, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhanashree Verma controversy : धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यातून तिने स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्यावर सणसणीत निशाणा साधला आहे.
मुंबई : सध्या 'राइज अँड फॉल' या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारी कोरिओग्राफर धनश्री वर्मा पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यातून तिने स्टँड-अप कॉमेडियन समय रैना याच्यावर सणसणीत निशाणा साधला आहे. या वादाचे कारण ठरले आहे समय रैनाची एक नवीन जाहिरात.
काही दिवसांपूर्वी स्टँड-अप कॉमेडियन समय रैना आणि धनश्री वर्माचा पूर्व-पती क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची कथित मैत्रीण आरजे महवश यांनी एकत्र एका ब्रँडसाठी जाहिरात शूट केली होती. यादरम्यान समय रैनाने आरजे महवशला अनेकदा अप्रत्यक्षरित्या धनश्रीचा उल्लेख करत चिडवण्याचा प्रयत्न केला. त्याने 'शुगर डॅडी' सारखे शब्द वापरले आणि धनश्री ज्या कार्यक्रमात आहे, त्याचाही उल्लेख केला.
advertisement
समय रैनाने राईज अँड फॉल आणि दोन महिने या दोन गोष्टींचा उल्लेख केला होता. धनश्रीने तिच्या शोमध्ये सांगितले होते की, लग्नानंतर एक-दोन महिन्यांतच युजवेंद्रसोबत तिचे मतभेद सुरू झाले होते. दुसरा उल्लेख म्हणजे, समय रैनाने घातलेला टी-शर्ट, ज्यावर 'बी युवर ओन शुगर डॅडी' असे लिहिले होते. असाच टी-शर्ट युजवेंद्रने त्यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीदरम्यान घातला होता. याच गोष्टींचा संदर्भ घेत धनश्री वर्मानेही समय रैनाला सणसणीत उत्तर दिलं आहे.
advertisement
advertisement
धनश्रीने आपल्या कुत्र्याचा एक गोड फोटो शेअर करत त्यावर लिहिले, "काळजी करू नका मित्रांनो, माझ्या आईचा चांगला काळच (समय) सुरू आहे!" इतकेच नव्हे, तर यावेळी तिने 'बुरी नजर वाले तेरा मुंह काला' असे लिहिलेला एक स्टिकरही जोडला. धनश्रीने थेट कोणाचेही नाव घेतले नसले तरी, तिच्या चाहत्यांनी या पोस्टचा थेट संबंध समय रैनाच्या कार्यक्रमाशी जोडला आहे.
advertisement

या सगळ्या गदारोळात धनश्रीने आपल्या आयुष्यात आनंदी असल्याचा संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे, पण या टोमणेबाजीमुळे सध्या युजवेंद्र-धनश्री आणि समय रैना यांच्यातील वाद पुन्हा एकदा वाढला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'बुरी नझरवाले तेरा मुह काला!', चहलवरून ट्रोल करणाऱ्या समय रैनाला धनश्री वर्माचं सणसणीत उत्तर, म्हणाली...