सलमानच्या शोमध्ये एकता कपूरने दिली ऑफर
एकता कपूरने 'बिग बॉस १९' च्या मंचावर येऊन सांगितले की, सलमान खानच्या शोमध्ये नवीन कलाकारांना ऑफर देणे ही तिची परंपरा आहे. यावेळी तिने दोन स्पर्धकांना संधी दिली. एकता कपूर म्हणाली, "सलमान सरच्या शोमध्ये ऑफर देणे ही माझी परंपरा आहे. यावेळी मी दोन लोकांना कास्ट करू इच्छिते. त्यापैकी एक अभिनेता नाही, तो म्हणजे संगीतकार अमाल मलिक."
advertisement
यानंतर एकताने तान्या मित्तलचे नाव घेत म्हटले, "आणि दुसरी व्यक्ती - दुनिया पित्तल दी! तान्या मित्तल, मी तुम्हाला कास्ट करू इच्छिते!" एकताची ही ऑफर ऐकून तान्याला खूप आनंद झाला. "हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, मॅम. खूप खूप धन्यवाद," असे म्हणत तान्याने तिचे आभार मानले.
सलमानचा मजेदार प्रश्न
तान्याला ही मोठी संधी मिळाल्यावर होस्ट सलमान खानने गंमत केली, ज्यामुळे घरात एकच हशा पिकला. सलमान खानने तान्याला चिडवत विचारले, "गरीब मुलीचा रोल आहे, कसा करशील?" तान्याची लोकप्रियता 'बिग बॉस १९' मध्ये एंट्री केल्यापासून खूप वाढली आहे. शो संपायला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना मिळालेले हे गिफ्ट तिच्यासाठी खूप मोठे आहे.
तान्या मित्तलने व्यक्त केली होती टीव्हीवर काम करण्याची इच्छा
काही दिवसांपूर्वीच तान्या घरात गौरव खन्ना आणि अश्नूर कौर यांच्यासोबत टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करण्याबद्दल बोलत होती. गौरव खन्नाने सांगितले होते की, तान्याच्या भावाने तिला टीव्हीमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. तेव्हा तान्या मस्करीत म्हणाली होती, "मला खात्री आहे की मी कोणत्याही 'बहू'च्या रोलमध्ये कास्ट होऊ शकते, टिपिकल बहू मटेरियल! आणि जर कुनिका सदानंद मॅम माझी सासू निघाल्या, तर तिथे स्क्रिप्टचीही गरज नाही!" आता एकता कपूरच्या शोमध्ये तान्या 'टिपिकल बहू' होते की 'व्हॅम्प', हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
