बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी सूरज सगळ्या स्पर्धकांची मिळून मिसळून वागताना दिसला. थोडा घाबरलेला सूरज निर्णय घेण्यात कमी पडला. गप्पा मारताना त्यानं त्याच्या आई-वडिलांच्या निधनाचा प्रसंग सांगितला.
( स्पर्धक शॉक, गुलीगत रॉक! TikTok करून सूरज दिवसाला कमवायचा इतके हजार, BBMमध्ये केला खुलासा )
सूरजचे आई - वडील तो लहान असतानाच जग सोडून गेले. त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. तर आईला वडिलांच्या निधनानं शॉक बसला आणि ती वेडी झाली. काही दिवसातच तिचंही निधन झालं. इतकंच नाही तर आई आणि आजी दोघींचं एकाच दिवशी निधन झाल्याचं सूरजनं सांगितलं.
advertisement
पंढरीनाथ कांबळे, आर्या आणि योगिता चव्हाण यांच्याशी बोलताना सूरजनं सांगितलं, "माझ्या वडिलांना कॅन्सर होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांचं टेन्शन घेऊन, विचार करून माझ्या आईला वेड लागलं. तिला रक्ताच्या उलट्या झाल्या. खूप त्रास व्हायचा. वडिलांनंतर ती पण खचून गेली. तेव्हा तिकडे सासूचा जीव गेला आणि इतके सुनेचा जीव गेला. माझी आजी गेली आणि इकडे आईपण गेली. दोघींनी एकमेकींची तोंड देखील पाहिली नाही".
सूरज म्हणाला, "मला कोणीच नाहीये. आई नाही, वडील नाही. आजोबा - आजी नाही. फक्त आत्या आहे आणि पाच बहिणी आहेत. मला आठ बहिणी होत्या. त्यातल्या 3 वारल्या. मी आठवा क्रिश्ना आहे".
"तुझ्या बहिणी तुला काय बोलतात तू असे रील्स वगैरे बनवतोस तेव्हा", असं पंढरीनाथ कांबळे यांनी विचारलं. तेव्हा सूरज म्हणाला, "मला खूप लुटलं ना लोकांनी. तर त्या मला म्हणतात की, तू सुधर. तू सुधरलास तर आम्हाला लय बरं वाटेल. मला टिकटॉकच्या वेळी रिबीन कापायला 80 हजार रुपये मिळायचे. आता पण मिळतात 30-50 हजार रुपये".