'बिग बॉस मराठी'च्या घरात आजचा भाग खूप विशेष असणार आहे. कारण आजपासून घरात फॅमिली वीक पार पडेल. आजच्या अभिजीत सावंतची फॅमिली त्याला भेटायला येणार आहे. बायको आणि मुलींना पाहून अभिजीतचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळणार आहे.
( KBC 16ला मिळाला पहिला करोडपती! कोण आहे 22 वर्षांचा चंद्रप्रकाश? )
समोर आलेल्या नव्या बिग बॉस "सर्व सदस्य फ्रिज" म्हणतात. त्यानंतर अभिजीत सावंत गार्डन एरियामध्ये असताना घरात त्याच्या पत्नीची एन्ट्री होते. पत्नीला पाहून अभिजीतचे डोळे पाणावतात. पुढे त्याच्या दोन्ही मुली देखील घरात येऊन त्याला घट्ट मिठी मारतात.
advertisement
अभिजीतच्या एका मुलीनं बिग बॉसना क्यूट रिक्वेस्ट केली. त्याची एक मुलगी म्हणते,"बिग बॉस मी इथे राहू शकते का?". चिमुकलीच्या प्रश्नाचं उत्तर देत 'बिग बॉस'पुढे म्हणतात,"चला एक वाइल्ड कार्ड मिळाला".
बिग बॉसच्या घरातील सगळेच सदस्य त्याँच्या फॅमिलीला भेटून भावूक होताना दिसणार आहे. प्रेक्षकही हा फॅमिली विक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.