बिग बॉसच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात निक्की रागाच्या भरात टेबलवर असलेली जेवणाची ताट लाथेनं उडवून देते. निक्कीचं हे वागणं पाहून घरातील सगळेच हैराण होतात. निक्की आणि वैभव यांच्या भांडणामुळे घर पुन्हा डिस्टर्ब होतं.
( Bigg Boss Marathi 5: 'सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू' इरिना आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण )
advertisement
प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय, निक्की अरबाजबरोबर इरिनाच्या नॉमिनेशनवरुन बोलत असते. निक्की म्हणते, "बरं झालं नॉमिनेट झाली...आणि आता एलिमिनेट पण झाली पाहिजे". हे ऐकून वैभव चिडतो आणि तिला म्हणतो, "निक्की अती होतंय आता". त्यावर निक्की म्हणते, "इरिना माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती. नंतर अॅड झाली आहे".
निक्कीच्या या वाक्यानंतर वैभव तिला थांबवतो आणि "हे असलं फालतू काही मी ऐकूण घेणार नाही", असं सांगतो. त्यावर निक्की त्याला "मी तुला नाही इरिनाला म्हणाली आहे", असं म्हणते. यावर वैभव भडकतो आणि "बोलूच नको... हातातील बोटं तोंडात घाल", असं म्हणतो. त्यावर निक्कीला त्याला म्हणते "मी तुला माझा PA म्हणून घरातून घेऊन आलेली नाही". निक्कीचा राग अनावर होतो आणि समोरच्या टेबलवर ठेवलेली दोन ताटं ती लाथेनं उडवून लावते.
या प्रोमो प्रेक्षकांनी निखिलला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. एका युझरनं लिहिलंय, "वैभव लढ रे बाबा... नको त्या निक्कीला चिटकूस". दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "काय किंमत वैभवची श्या,PA सोबत तुलना... खरं तर बॉडी गार्ड आणि नोकरच आहे म्हणा पण असं सर्वांसमोर बोलायची काय गरज होती". आणखी एका युझरनं लिहिलंय, "ह्या वैभव ला कळली असेल आता त्याची लायकी काय आहे त्या ग्रुप च्या नजरेत PA बोली त्याला ती"