Bigg Boss Marathi 5: 'सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू' इरिना आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bigg Boss Marathi 5 Update: 'बिग बॉस मराठी 5' यंदाच्या सीझन खूप चर्चेत आहे. स्पर्धक घरात चांगलाच कल्ला करत आहे. वाद, भांडण, मैत्री, सतत पहायला मिळत आहे. घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही.
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' यंदाच्या सीझन खूप चर्चेत आहे. स्पर्धक घरात चांगलाच कल्ला करत आहे. वाद, भांडण, मैत्री, सतत पहायला मिळत आहे. घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही. आजच्या भागातही निक्की आणि इरिनामध्ये मतभेद झालेले पाहायला मिळणार आहेत.
'बिग बॉस मराठी'च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये टीम A मधीला इरिना रूडाकोवा आणि निक्की तांबोळी एकमेकींसोबत भिडताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये इरिना म्हणत आहे,"मी तुझ्यामागे काहीही बोलले नाही". यावर निक्की म्हणते,"मी तुझ्यापद्धतीने घरात का वागू".
advertisement
पुढे इरिना निक्कीवा म्हणते,"तुला काय करायचं ते कर". इरिनाला उत्तर देत निक्की म्हणते,"सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू... हिला तिच्या देशात रिजेक्ट केलंय म्हणून आली आपल्या देशात आणि आपल्या शोमध्ये".
advertisement
दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे खरे आणि खोटे चेहरे समोर आले आहेत. घरात दररोज काही ना काहीतरी राडा आणि कल्ला होताना दिसतो. सतत सदस्यांची भांडणं आणि हेवेदावे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 21, 2024 4:49 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: 'सगळ्यांना विकून खाणारी आहेस तू' इरिना आणि निक्कीमध्ये कडाक्याचं भांडण