या 'शोले' चित्रपटाच्या शूटिंगच्यावेळी अनेक किस्से घडले होते. जे आता इतक्या वर्षांनंतर बाहेर आले आहेत. या चित्रपटाच्या अगोदरपासूनच अभिनेते धर्मेंद्र हे हेमाच्या प्रेमात होते. पण हेमाला स्वतःच्या प्रेमात पाडण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी खूप पैसाही खर्च केला होता. हा चित्रपट त्यांच्या या प्रेमासाठी निमित्त होता.
ज्या 'बसंती'ने दिली ओळख, तिच्यावरच नाराज होत्या हेमा मालिनी, पण का?
advertisement
कशी सुरु झाली हेमा आणि धर्मेंद्र यांची लव स्टोरी ?
'शोले' चित्रपटाच्या शूटिंगवेळी हेमा आणि धर्मेंद्र यांचा हा प्रेमाचा अँगल सुरु झाला होता. धर्मेंद्र हेमा मालिनीसोबत जास्त वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे अनेक वाकडे तिकडे प्लॅन बनवले होते. हेमा सोबतच्या रोमँटिक सीनला त्यांनी अनेक कारणे काढून रिटेक घेऊन ते सीन लांबवले होते. त्यांचे असे असायचे की काहीही करुन सीन लांबवायचा आणि सेटवर हेमा सोबत जास्त वेळ कसा घालवता येईल ते पाहायचे. यासाठी ते चक्क स्पॉट बॉयची मदत घ्यायचे आणि स्पॉटला पैसेही द्यायचे.
हेमासाठी धर्मेंद्रने खर्च केले चेक्क इतके रुपये..
अभिनेते धर्मेंद्र यांनी हेमाला प्रेमात पाडण्यासाठी शोले चित्रपटाच्या सेटवरती पैशांचा उपयोग केला होता. शूटिंगमध्ये एक सीन होता, ज्यात धर्मेंद्र हेमाला बंदूक चालवायला शिकवत असतात. या सीनला ते हेमाच्या एकदम जवळ येतात. त्यामुळे या सीनला धर्मेंद्र थोडा जास्त वेळ घेत होते. कारण सीनला ते काही न काही चूक करतील किंवा काहितरी सामान सेटवरती पाडतील. त्यामुळे तो सीन पुर्ण करण्यासाठी उशीर लागेल. धर्मेंद्रनी त्यासाठी स्पॉट बॉयला दोन हजार रुपये दिले होते. जेणेकरुन काही न काही कारणाने सीन पुर्ण करायला उशीर होईल. धर्मेंद्र यांच्या या प्रयत्नांवर हेमा खूपच खूश झाल्या होत्या. त्यानंतर इथून त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरु झाला.
