अभिनेत्याला विक्रेत्याची धमकी
व्हिडिओमध्ये खुशीच्या गोंधळाच्या दरम्यान फटाक्यांचा विक्रेता, बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला म्हणताना दिसतो की, हिला समजाव, हिचं जरा जास्तच होतंय, मार खाऊन जाईल इथून". यावर अभिनेत्री मोठ्याने ओरडून म्हणते, “तो माझ्या गाडीला धडक देऊन गेला, हे सगळे इथेच होते.” त्यावर विक्रेता म्हणतो, “आम्ही तुमच्या गाडीचा ठेका घेतलाय का?”
advertisement
Govinda Gun Fire : पहाटे 4.45 वाजता आवाज आला, खोलीत रक्ताचा सडा; लेकीने सांगितली गोविंदाच्या गोळीबाराची Inside Story
खुशीचा पोलिसांसोबत वाद
गोंधळा दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिसाने वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण अभिनेत्री त्याच्यावरच भडकली आणि ओरडून म्हणाली,“हे लोक जे काही करतात ते चालतं, माझ्या गाडीला रिक्षावाला धडक देऊन गेला, तुमचा 100 नंबर लागत नाही. माझी गाडी का ठोकली?”, असं म्हणत खुशी दुकानातून फटाके उचलून रस्त्यावर फेकू लागते. विक्रेता वारंवार अभिनेत्रीला सांगत होता की त्यांचं नुकसान करू नको, पण अभिनेत्री सतत गोंधळ करत राहिली. सध्या या प्रकरणावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. याआधीही खुशी मुखर्जी तिच्या एका ड्रेसमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.
