रिया हिने आपला पासपोर्ट हातात घेऊन एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावनांना मोकळीक दिली. तिची ही पोस्ट खूपच भावनिक आहे. रियाने लिहिलं आहे, “गेली ५ वर्षं माझ्यासाठी सहनशीलता हाच माझा एकमेव पासपोर्ट होता. अगणित लढाया, न संपणारी आशा. आज, माझा पासपोर्ट पुन्हा माझ्या हातात आहे. माझ्या ‘चॅप्टर २’ साठी मी सज्ज आहे! सत्यमेव जयते.”
advertisement
रियाला मिळालेल्या या कायदेशीर विजयानंतर शिबानी दांडेकर, फातिमा सना शेख यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत तिला पाठिंबा दर्शवला आहे.
प्रवासाच्या बंधनातून मुक्तता
२०२० मध्ये रियाला जामीन मिळाला तेव्हा तिच्यावर परदेशात प्रवास न करण्याची अट घालण्यात आली होती आणि तिचा पासपोर्ट एनसीबीकडे जमा होता. यामुळे तिला प्रत्येक परदेशी ट्रिपसाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागत होती, ज्यामुळे तिच्या कामाच्या कमिटमेंट्समध्ये अडथळे येत होते.
रियाच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, तिने जामिनाच्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत आणि तिला शूटिंग, ऑडिशन्स व मीटिंग्ससाठी वारंवार प्रवास करणे आवश्यक आहे. जस्टिस नीला गोखले यांनी रियाचे सहकार्य आणि नियमांचे पालन लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
जरी पासपोर्ट परत मिळाला असला, तरी रियाला अजूनही कोर्टाच्या सुनावणीला हजर राहावे लागणार आहे आणि परदेशात जाण्यापूर्वी चार दिवस आधी प्रवासाचे आणि निवासाचे तपशील कोर्टात द्यावे लागणार आहेत.