रकुलसोबत नेमकं काय घडलं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण भगनानी कुटुंब रेस्टॉरंटबाहेर एकत्र उभे असल्याचे दिसते. याचवेळी जॅकी भगनानी पुढे सरसावून एका लहान मुलाला उचलून फिरवण्याचा प्रयत्न करतो. नेमकं याच क्षणी, रकुल प्रीत सिंग त्याच्याजवळ जात असताना, त्या मुलाचा पाय थेट रकुलच्या चेहऱ्यावर लागतो. रकुल या प्रकाराने शॉक्ड होते आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. विशेष म्हणजे, त्यांच्या मागे उभे असलेले जॅकी भगनानी यांचे वडील हा प्रकार पाहून हसतात.
advertisement
Kissing Controversy नंतर पहिल्यांदाच राखी सावंत-मीका सिंग एकत्र, रोमँटिक डान्स VIDEO VIRAL
या सगळ्या गमतीशीर गोंधळातही जॅकी भगनानी थांबला नाही. त्याने त्या मुलाला उचलून थेट शाहरुख खान स्टाईलमध्ये पोझ दिली! रकुल मात्र बाजूला उभी राहून हे सगळे पाहत राहिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक खूप मजा घेत आहेत.
नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
एका व्यक्तीने लिहिले, "बिचारी रकुल! तिला जास्त जोरात लागलं नसेल ना?" दुसऱ्याने लिहिले, "जॅकीला काही फरकच पडत नाहीये, तो स्वतःच्या मस्तीत आहे!" एका युजरने सासरच्या प्रतिक्रिया टिपल्या, "तिकडे बघा, सासरेबुवा कसे हसतायत!"
कोविड काळात रंगली लव्हस्टोरी
जॅकी आणि रकुलची प्रेमकहाणीही खूप अनोखी आहे. त्यांची मैत्री कोविड-१९ दरम्यान झाली, जेव्हा रकुलने जॅकीकडून एक वोड्काची बाटली उधार घेतली होती! त्यांची मैत्री वर्कआउट आणि फिटनेसमुळे अधिक घट्ट झाली. २०२१ मध्ये त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि २०२४ मध्ये त्यांनी गोव्यात आनंद कारज (शीख पद्धत) आणि सिंधी विवाह अशा दोन पद्धतीने लग्न केले.