पार्टीत नेमकं काय घडलं?
रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत सोनाक्षी आणि झहीर एकत्र आले होते. त्यांच्यासोबत सोहेल खानचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान हे देखील होते. हे चौघे कॅमेऱ्यासमोर एकत्र उभे राहून पोझ देत असतानाच, झहीरने एक गंमत केली. त्याने अचानक सोनाक्षीच्या पोटावर, म्हणजेच 'बेबी बंप' असल्याचं भासवत, हात ठेवण्याचा अभिनय केला.
advertisement
हात ठेवताच त्याने मजेशीर स्वरात कॅमेऱ्याकडे पाहत म्हटले, "असली सोना". झहीरची ही गंमत पाहून सोनाक्षीला आश्चर्याचा धक्का बसला आणि ती लगेच हसून लाल झाली. तिने त्याचा हात बाजूला सारत "झहीर!" असे म्हणून त्याला थांबवले.
झहीरने ही कृती करून एक प्रकारे पत्नीच्या प्रेग्नंसीच्या अफवांना तात्पुरता पूर्णविराम लावला आहे. त्याची या अफवा फेटाळण्याची स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे. मात्र, सोशल मीडियावर लोक अजूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली, "हे फक्त नाटक करत आहेत की ती प्रेग्नंट आहे म्हणून." तर दुसऱ्याने विचारले, "ती खरंच प्रेग्नंट आहे का?"
सोनाक्षीने दिलं भन्नाट उत्तर
सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर नुकत्याच अनेक पोस्ट केल्या. या फोटोंसोबत तिने जे कॅप्शन लिहिले होते, ते खूपच मजेदार होते. तिने लिहिले "मी मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या प्रेग्नंसीचा जागतिक विक्रम केला आहे. आमच्या प्रिय आणि अति-बुद्धिमान माध्यमांनुसार मला १६ महिन्यांची गरोदर झाली आहे! केवळ पोटावर हात ठेवून पोझ दिल्याबद्दल त्यांनी मला प्रेग्नंट ठरवले आहे."
सोनाक्षीने २०१० मध्ये 'दबंग'मधून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. 'लुटेरा', 'मिशन मंगल' आणि 'हीरमंडी' यांसारख्या कलाकृतींमध्ये तिचे काम गाजले आहे. सात वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने २०२४ मध्ये झहीरसोबत रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नात दोन्ही भाऊ अनुपस्थित असल्याने बरीच चर्चा झाली होती.