TRENDING:

Best Horror Movies: हवेली, वाडा आणि अंधाऱ्या रात्री; बॉलिवूडचे हॉरर सिनेमे, 5 वा पाहून तर डोकं सुन्न पडेल

Last Updated:

Best Horror Movies: बॉलिवूडमध्ये फक्त प्रेमकथा, गाणी आणि कॉमेडीच नाही, तर काही असे हॉरर चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांची खरोखरच झोप उडवली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडमध्ये फक्त प्रेमकथा, गाणी आणि कॉमेडीच नाही, तर काही असे हॉरर चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांची खरोखरच झोप उडवली आहे. या सिनेमांमध्ये फक्त भूत-प्रेताची पाखंडी कथा नाही, तर मानवी भीती, अंधश्रद्धा आणि भारतीय समाजातील खोलवर रुजलेले प्रश्नही दाखवले आहेत. म्हणूनच हे सिनेमे अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत.
बॉलिवूडचे हॉरर सिनेमे
बॉलिवूडचे हॉरर सिनेमे
advertisement

चला तर जाणून घेऊया, OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेले 5 भन्नाट बॉलिवूड हॉरर चित्रपट, जे तुम्ही पाहायलाच हवेत.

2025 चा सर्वात मोठा डिजास्टर सिनेमा, आधी थिएटरमध्ये फ्लॉप आता नेटफ्लिक्सवरुनही हटवला

1.'भूत'

भूत सिनेमाची कहानी एका उंच इमारतीत नवीन फ्लॅट भाड्याने घेणाऱ्या जोडप्यावर आधारित आहे. पती विशालला कळते की फ्लॅटची कमी किंमत ही एका आईच्या आत्महत्येमुळे आहे जिने तिच्या मुलाची हत्या केली आणि नंतर तिने आत्महत्या केली. तो त्याची पत्नी स्वातीपासून हे गुपित ठेवतो. सत्य कळल्यानंतर, स्वातीचे वर्तन बदलते आणि तिला हळूहळू एका आत्म्याने पछाडले जाते. अखेर, विशाल जादूटोणा करणाऱ्या सरिताची मदत घेतो आणि तिला कळते की महिलेची हत्या झाली आहे. या चित्रपटातील उर्मिलाच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले.

advertisement

2. राझ

बिपाशा बसू आणि डिनो मोरिया यांचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. लग्न वाचवण्यासाठी हिल स्टेशनवर गेलेल्या जोडप्याला सूडबुद्धी आत्म्याचा सामना करावा लागतो. या सिनेमामुळेच बिपाशा “क्वीन ऑफ हॉरर” म्हणून ओळखली जाऊ लागली. Prime Video वर हा सिनेमा तुम्ही पाहू शकता.

3. बुलबुल

हा सिनेमा 19 व्या शतकातील बंगालच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एक बालवधू मोठी होऊन गावावर राज्य करते आणि गावात रहस्यमय मृत्यूंची मालिका सुरू होते. हा सिनेमा हॉररसोबत महिला सक्षमीकरण आणि पितृसत्तेवर भाष्य करतो. Netflix वर तुम्ही हा पाहू शकता.

advertisement

4. 1920

विक्रम भट्ट दिग्दर्शित हा सिनेमा खूप चर्चेत राहिला. जुन्या हवेलीत नवविवाहित जोडपं राहायला येतं आणि पत्नीला आत्मा पछाडतो. चित्रपटातील दृश्यांनी The Exorcist ची आठवण करून दिली. हा सिनेमा Prime Video वर उपलब्ध आहे.

5. तुम्बाड

भारतीय सिनेमातील सर्वात हटके आणि क्रिटिकली अॅक्लेम्ड हॉरर. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्रातील कथा. शापित गाव, खजिन्याची लालसा आणि हस्तूर देवतेची भीती. या सिनेमाला 64 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळाली. Prime Video वर तुम्ही या सिनेमाचा आनंद घेऊ शकता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Best Horror Movies: हवेली, वाडा आणि अंधाऱ्या रात्री; बॉलिवूडचे हॉरर सिनेमे, 5 वा पाहून तर डोकं सुन्न पडेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल