१४ जून २०२० रोजी सुशांत सिंग राजपूत वांद्रे येथील आपल्या घरी मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या सहकाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते.
आरोप सिद्ध होण्यासारखे पुरावे सापडले नाहीत
रियाने सुशांतला बेकायदेशीर कोठडीत ठेवले, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले आणि त्याच्या मालमत्तेची चोरी केली, असे आरोप कुटुंबियांनी लावले होते. सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे आणि नंतर बिहार पोलिसांकडे असलेला हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
advertisement
कोकणातलो 'दशावतार' आता साऊथ गाजवणार! 'बाबुली मेस्त्री' मल्याळममध्ये बोलणार, दिग्दर्शकाची मोठी घोषणा
सीबीआयने आपल्या अंतिम अहवालात स्पष्ट केले आहे की, तपासामध्ये रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्धच्या 'बेकायदेशीर कोठडी', 'आत्महत्येस प्रवृत्त करणे' किंवा 'चोरी' या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. रिया आणि तिच्या सहकाऱ्यांवर दोष सिद्ध होईल, असे ठोस निष्कर्ष सीबीआयला काढता आले नाहीत.
कुटुंबियांचा संताप आणि पुढचे पाऊल
सीबीआयने हा अहवाल सादर करताच, सुशांतच्या कुटुंबियांनी त्वरित यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतला न्याय मिळाला नसल्याची त्यांची भावना आहे. या अहवालावर समाधान न झाल्याने, सुशांतचे कुटुंब आता या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाला इतकी वर्ष उलटूनही, अजूनही या मृत्यूचे गूढ पूर्णपणे उलगडले नसल्याची भावना सुशांतचे चाहते आणि कुटुंबिय व्यक्त करत आहेत.
