'राईझ अँड फॉल' ला मिळाला पहिला विजेता
६ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या शोमध्ये स्पर्धकांनी अनेक आव्हानात्मक टास्क पूर्ण केले. सुरुवातीला एक वर्कर म्हणून खेळायला सुरूवात करणाऱ्या अर्जुन बिजलानीने आपल्या जिद्द, दमदार रणनीती आणि सातत्याच्या बळावर हळूहळू रुलरची भूमिका मिळवली आणि अखेर तो विजेता ठरला. अर्जुनने २८ लाख १० हजार रुपये इतकी मोठी बक्षीस रक्कम जिंकली आहे. त्याच्या या विजयावर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला असून, 'तोच खरा परफेक्ट विनर' असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
advertisement
रनरअप कोण ठरले?
या सीजनमध्ये आरुष भोला हा पहिला रनरअप ठरला, तर अरबाज पटेल याने दुसऱ्या रनरअपचे स्थान मिळवले. आरुष भोला याने सीजनचा बराचसा काळ बेसमेंटमध्ये 'मजूर' म्हणून घालवला, पण तो सातत्याने टास्क जिंकत राहिला आणि एलिमिनेशनमधून वाचत थेट फायनलपर्यंत पोहोचला. अरबाज पटेल याने 'शासक' म्हणून शोची सुरूवात केली आणि पेंटहाऊसमध्ये आपला प्रभाव दाखवला. बेसमेंटमध्ये दोन आठवडे घालवूनही त्याने पुन्हा 'टॉप'मध्ये परत येण्याचे यश मिळवले. या शोचा निकाल स्पर्धकांनी केलेल्या इंटरनल व्होटिंगद्वारे लावण्यात आला, ज्यामुळे अर्जुनच्या खेळाला सर्व सहकाऱ्यांनीही मान्यता दिली.
विजेतेपद मिळाल्यानंतर अर्जुन बिजलानी खूप भावूक झाला. तो म्हणाला, "राईझ अँड फॉलने मला शिकवले की, प्रत्येक अपयश हे पुढे जाण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल असते. हा प्रवास सोपा नव्हता. रोज एक नवीन आव्हान आणि एक नवीन धडा होता. उतार-चढाव, तणाव, मैत्री आणि संघर्ष... या सगळ्यांनी मला अशा पद्धतीने पारखले, ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. आरुष आणि अरबाजसह सर्व सह-स्पर्धकांचा मी आभारी आहे, ज्यामुळे हा विजय अधिक सुंदर झाला."