विरोधाला कंटाळून थेट गोव्याला पळ काढला!
झीशानने एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांतील अडचणी सांगितल्या. झीशानने आठवण करून दिली, "आमचे लग्न सोपे नव्हते, कारण तो एक हिंदू-मुस्लिम विवाह होता. घरातून आणि लोकांकडून होणारा विरोध व टोमणे टाळण्यासाठी आम्ही एक धाडसी निर्णय घेतला. आम्ही दोघेही कोणाशीही संपर्क न ठेवता चार दिवसांसाठी गोव्याला पळून गेलो आणि तिथे खूप आनंद लुटला."
advertisement
'स्पेशल मॅरेज ॲक्ट'ने लग्न
गोवा ट्रीपवरून परतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात या जोडप्याने कायदेशीररित्या लग्न केले. झीशानने स्पष्ट केले की, "आम्ही खूप स्पष्ट होतो की आम्ही 'स्पेशल मॅरेज ॲक्ट' नुसारच लग्न करू. आम्हाला आमच्या लग्नात कोणत्याही धार्मिक हस्तक्षेपाची गरज नव्हती."
त्याने पुढे सांगितले, "आम्ही दोघेही जे काही करायचे ठरवू, ते करू शकतो. मी मुस्लिम म्हणून राहायला तयार असलो तरी रसिकावर धर्माचे पालन करण्यासाठी दबाव आणणार नाही आणि जर तिला हिंदू म्हणून राहायचे असेल, तर तिच्यावर मुस्लिम कायद्यांचे पालन करण्याचा कोणताही दबाव नाही."
या दोघांच्या स्पष्ट भूमिकेमुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे, अखेर दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या नात्याला स्वीकारले आणि ते लग्नातही आनंदाने सहभागी झाले. या जोडप्याने केवळ प्रेमसंबंधच जपले नाहीत, तर धार्मिक कट्टरतेच्या पलीकडे जाऊन 'स्पेशल मॅरेज ॲक्ट'च्या माध्यमातून समानतेचे नाते कसे जपले, हे दाखवून दिले आहे.
