TRENDING:

विजय देवरकोंडाच रश्मिकाचा बॉयफ्रेंड? अभिनेत्रीने बोलता बोलता सगळंच सांगून टाकलं

Last Updated:

Rashmika Mandanna Vijay Deverakonda Dating Rumors : रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं अनेक दिवसांपासून म्हटलं जातं होतं. या चर्चा कुठेतरी खऱ्या असल्याचं समोर आलं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्रीचा छावा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ घातला आहे तर दुसरीकडे तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे ती चिंचेत आहे. या सगळ्या चर्चांमध्ये रश्मिकाचं अफेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रश्मिका ही अभिनेता विजय देवरकोंडाला डेट करत असल्याचं अनेक दिवसांपासून म्हटलं जातं होतं. या चर्चा कुठेतरी खऱ्या असल्याचं समोर आलं आहे.
रश्मिका मंदाना - विजय देवरकोंडा
रश्मिका मंदाना - विजय देवरकोंडा
advertisement

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघे डेट करत असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. मात्र त्यांनी अद्याप त्यांचं नातं ऑफिशिअल केलेलं नाही.  अलीकडेच एका मुलाखतीत विजयने सांगितलं होतं की, तो अविवाहित नाही. आता त्याने रश्मिकाने जोडीदार होण्याचे संकेत दिले आहेत.

Rashmika Mandana : 'छावा'च्या ट्रेलरला लंगडत आली रश्मिका, पायाला झालंय काय? X-Ray रिपोर्ट व्हायरल

advertisement

कोण आहे रश्मिकाचा पार्टनर?

रश्मिका मंदानाने हॉलिवूड रिपोर्टर बोलताना स्वतःला पार्टनर म्हणवून घेत, ती सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिच्या एक्सप्रेशन्समधून तिने सांगितलं. रश्मिका म्हणाली, "घर हे माझे सुखाचे ठिकाण आहे. त्यामुळे मला स्थिरता जाणवते. मला माझ्या मुळाशी जोडून ठेवते. मला वाटतं यश येतं आणि जातं, पण ते कायमचं नसतं. पण घर कायम आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणाहून काम करते. मला कितीही प्रेम आणि प्रसिद्धी मिळाली, तरीही मी फक्त एक मुलगी आहे, फक्त एक बहीण आहे, फक्त एक जोडीदार आहे. मी त्या आयुष्याचा, माझ्या वैयक्तिक आयुष्याचा खरोखर आदर करतो."

advertisement

विजय आणि रश्मिकाने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांची जोडी केवळ ऑनस्क्रीनच नाही तर पडद्याबाहेरही चाहत्यांना आवडते.

जोडीदारात कोणते गुण असावेत?

advertisement

रश्मिका मंदानाने तिला तिच्या जोडीदारामध्ये गुण असावेत याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "असं म्हणतात की डोळे माणसाचं खरेपण समोर आणतं आणि माझा यावर विश्वास आहे.  मी हसत राहते त्यामुळे मी अशा लोकांकडे आकर्षित होते ज्यांचा हसरा चेहरा आहे आणि अर्थातच कोणीतरी जो त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करतो, मग कोणीही असो."

विजय आणि रश्मिकाचा चित्रपट

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात चढ-उतार, कांदा आणि मक्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा पहिला एकत्र चित्रपट गीता गोविंदम होता. ज्यात त्यांच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले होते. त्यानंतर त्यांनी डिअर कॉम्रेड या चित्रपटात काम केलं.हा चित्रपटही हिट ठरला. चित्रपटाच्या सेटवरच रश्मिका आणि विजय एकमेकांच्या प्रेमात पडले होते, असं म्हटलं जातं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
विजय देवरकोंडाच रश्मिकाचा बॉयफ्रेंड? अभिनेत्रीने बोलता बोलता सगळंच सांगून टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल