एका मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर यांनी एआयच्या क्षमतेवर भाष्य करत हे भाकीत केले. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, एआयमुळे येणाऱ्या काळात चित्रपट बनवण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. महेश मांजरेकर म्हणाले, "माझे स्पष्ट मत आहे की, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल, बंद म्हणजे बंदच! एआयने आता इतका टेकओव्हर केला आहे की, ते जे व्हिज्युअल्स तयार करतात, ते कॅमेऱ्यावर करणं शक्यच नाही."
advertisement
ते पुढे म्हणाले, "तुम्ही कितीही चांगले व्हीएफएक्स केले, तरी तुम्ही ती व्हिज्युअल्स कॅमेऱ्यावर देऊ शकत नाही. मी घरी बसून 'टायटॅनिक'सारख्या चित्रपटातली लाइटिंग, लिओनार्डो डिकॅप्रिओपेक्षा चार पटींनी सुंदर हिरो... यासह सिनेमा बनवला, तर मी तो सहज बनवू शकतो."
महाभारताचा ट्रेलर आणि कोडची भीती
एआयच्या प्रगतीवर बोलताना मांजरेकर यांनी महाभारताच्या एका एआय-निर्मित ट्रेलरचे उदाहरण दिले. "मी 'महाभारत'चा ट्रेलर पाहिला, तो अक्षरशः डोळे दीपवणारा ट्रेलर आहे. जर हे सगळे एका क्लिकवर होणार असेल, तर लोक कलाकारांवर का पैसे खर्च करतील?" असा सवाल त्यांनी केला.
अडल्ट साइटवर दिसले साऊथ सुपरस्टारचे VIDEO, झटक्यात व्हायरल; पोलिसांकडे पोहचलं प्रकरण, कोण आहे तो?
मांजरेकर यांना भीती आहे ती एका 'कोड'ची. ते म्हणाले, "ज्या दिवशी एआय हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल, त्या दिवशी आपण संपणार. रोज १० हजार सिनेमे बनतील आणि याला काही खर्चही येत नाही. सहा महिन्यांपूर्वी मी पाहिलेल्या एआयमध्ये आणि आताच्या एआयमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे."
२ हजार रुपयांत जाहिरात चित्रपट!
मांजरेकर यांनी त्यांच्या एका मित्राचा अनुभव सांगताना सांगितले की, "माझ्या एका मित्राने एआयच्या मदतीने जाहिरात फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये... त्यामुळे येत्या दीड वर्षांत सिनेमे बंद होणार, हे खूपच धोकादायक आहे. हे माझं भाकीत आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी गुपचूप नाटकांकडे वळलं पाहिजे."
