TRENDING:

Dashavatar : 'दशावतार'च्या खेळापुढे 'आरपार' अन् 'बिन लग्नाची गोष्ट' पडली फिकी; तिकीटबारीवर कोणाचं कलेक्शन किती?

Last Updated:

Dashavatar Box Office Collection Day 2 : 'दशावतार' या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा खेळ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Dashavatar Box Office Collection : 'दशावतार' हा बहुप्रतीक्षित सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवरील भरघोस कमाई सर्वकाही सांगत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी ज्याप्रकारे बाबुली मेस्त्रीची भूमिका साकारली आहे त्याला तोड नाही. ओशन फिल्म्स निर्मित आणि सुबोध खानोलकर लिखित, दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'दशावतार','आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटांत तिकीटबारीवर 'दशावतार'चं राज्य असलेलं पाहायला मिळत आहे.

advertisement

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'दशावतार' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 58 कोटी रुपयांची कमाई केली. तर रिलीजच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. वीकेंड असल्याने शनिवारी प्रेक्षकांनी सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी करत 1.39 कोटींचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे न्यूज 18 मराठीसोबत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले होते,"रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी सिनेमाचे शो वाढवण्यात आले आहेत". एकंदरीतच बॉक्स ऑफिसवरचे आकडे मराठी इंडस्ट्रीसाठी सुखावणारे आहेत. 'आरपार' या चित्रपटाने रिलीजच्या दोन दिवसांत 35 लाखांची कमाई केली आहे. तर प्रिया बापट-उमेश कामंत यांच्या 'बिन लग्नाची गोष्ट' या चित्रपटाने 0.28 कोटी कमावले आहेत.

advertisement

Dashavatar : 'दशावतारातील' एका सीनसाठी दिलीप प्रभावळकरांनी मारलेली खाडीत उडी; आठवणीत रमले बाबुली मेस्त्री

'दशावतार' आज किती कमाई करणार?

'दशावतार'चे आज सकाळचे अॅडव्हान्स बुकिंग लक्षात घेता या चित्रपटाचे 5 लाख रुपयांची कमाई केलेली पाहायला मिळत आहे. अर्थात आज रविवार असल्याने हा आकडा आखणी वाढेल. फक्त दोन दिवसांत या चित्रपटाने देशात 1.09 आणि जगभरात 2.2 कोटींचा गल्ला जमवला आहे.

advertisement

'दशावतार' या चित्रपटातील दिलीप प्रभावळकरांचं काम, सुबोध खानोलकरचं दिग्दर्शन, सिनेमाची बांधणी, सिनेमाला दिलेला साऊथ टच, कोकणातील निसर्ग सौंदर्यचा सुयोग्य वापर, तगडी स्टारकास्ट अशा अनेक गोष्टींने या सिनेमाची माऊथ पब्लिसिटीदेखील जोरदार होत आहे. 'दशावतार' पाहिल्यानंतर थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षक भावूक होत आहे. डोळे पुसत एक चांगली कलाकृती पाहिल्याच्या आनंदात त्यांची पाऊले घरच्या दिशेने जात आहेत. एक वेगळा विषय असणाऱ्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

advertisement

तगडी स्टारकास्ट असणारा 'दशावतार'

'दशावतार' या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे अशी तगडी स्टारकास्टची फौज पाहायला मिळत आहे. या चित्रपटासाठी प्रत्येकानेच मेहनत घेतली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी ज्यापद्धतीने या चित्रपटात काम केलंय ते अंगावर शहारे आणणारं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar : 'दशावतार'च्या खेळापुढे 'आरपार' अन् 'बिन लग्नाची गोष्ट' पडली फिकी; तिकीटबारीवर कोणाचं कलेक्शन किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल