Dashavatar : 'दशावतारातील' एका सीनसाठी दिलीप प्रभावळकरांनी मारलेली खाडीत उडी; आठवणीत रमले बाबुली मेस्त्री
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Dilip Prabhavalkar on Dashavatar : ज्येष्ठ दिलीप प्रभावळकरांसाठी 'दशावतार' या चित्रपटातील बाबुली मेस्त्री ही भूमिका आव्हानात्मक होती. या सिनेमामुळे 'दशावतार' हा कलाप्रकार त्यांना जवळून अनुभवता आला आहे.
Dashavatar : 'दशावतार' या मराठी चित्रपटाची, या सिनेमातील दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेल्या बाबुली मेस्त्रीची, सुबोध खानोलकरच्या दिग्दर्शनाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. टीझर आऊट झाल्यापासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. अखेर हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठई दिलीप प्रभावळकर यांनी खास खाडीत उडी मारली होती. 50 दिवस कोकणात ते या चित्रपटाचं शूटिंग करत होते.
advertisement
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांना बाबुली मेस्त्री सारख्या भूमिका करताना दमायला होतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत दिलीप प्रभावळकर म्हणाले,"खूप दमायला होत नाही. शारिरीक थकवा येण्यासाठी अनेक सीन या चित्रपटात होते. जंगलातील पळापळ होती, पाण्यात उडी मारणं होतं, खाडीत पोहोलो. उथळ पाण्यात पोहोलो, पाण्याखाली गेलो. लोकांचा आदर आणि कौतुक पाहिल्यानंतर या गोष्टी लक्षात येतात. बाबुली मेस्त्री या भूमिकेने मला अनेक गोष्टी दिल्या. यापद्धतीच्या भूमिकांना न्याय देऊ शकतो, शारिरीक, मानसिक थकवा आणणारी भूमिकासुद्धा परिणामकारकपणे करू शकतो, असा आत्मविश्वास दिला. कोकणी माणसाची भूमिका माझ्यासाठी नवी नाही पण 'दशावतार' नक्कीच आव्हानात्मक होता. सुबोध खानोलकरच्या चित्रपटाच्या माध्यमातून मला 800 वर्ष जुनं असलेला 'दशावतार' हा कलाप्रकार जवळून पाहता आला".
advertisement
दशावतार माझ्या अगदी जवळचा : गुरू ठाकूर
गुरू ठाकूर यावेळी म्हणाले,"कोकणातला असल्यामुळे बालपणी सुट्टीत मी गावी असायचो. त्यावेळी अनेकदा 'दशावतार' पाहिलाय. गुरू ठाकूरने या चित्रपटाची संहिता ऐकवल्यानंतर मला कुठेतरी जाणवलं की हे अगदी माझ्या जवळचं आहे. पूर्वी जत्रेच्या दरम्यान 'दशावतार' खूपदा पाहिलाय. त्यामुळे या चित्रपटाचे संवाद लिहिणे माझ्यासाठी सोप्पं झालं".
advertisement
कोकणात्या मातीत घडणारं दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावरही प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे. एकाचवेळी अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या सिनेमातील दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. सध्याच्या घडीला मराठीतला उत्कृष्ट चित्रपट म्हणून 'दशावतार' पाहता येईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dashavatar : 'दशावतारातील' एका सीनसाठी दिलीप प्रभावळकरांनी मारलेली खाडीत उडी; आठवणीत रमले बाबुली मेस्त्री