advertisement

गर्लफ्रेंडने सुपारी दिली, बीडमधील अपहरणात लव्ह ट्रँगलचा ट्विस्ट, 2 प्रेयसींची भानगड अंगलट

Last Updated:

बीड शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरातून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी नागनाथ नन्नवरे या व्यक्तीचं अपहरण केलं होतं. या अपहरणामागचं कारण आता समोर आलं आहे.

Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात
Beed News: बीड अपहरण प्रकरणात मोठं अपडेट, 24 तासांत तपासाची चक्रे फिरली, 10 जण ताब्यात
बीड शहरातील चऱ्हाटा फाटा परिसरातून शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास 10 ते 12 जणांनी नागनाथ नन्नवरे या व्यक्तीचं अपहरण केलं होतं. आरोपींनी नागनाथ यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण करत आणि रस्त्यावरून फरपटत घेऊन जात अपहरण केलं होतं. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील टोकवाडी परिसरात नेऊन डांबून ठेवलं. पण पोलिसांनी अवघ्या १४ तासांत या प्रकरणाचा उलगाडा करत नागनाथ यांची सुटका केली. तसेच 10 आरोपींसह दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेतल्या.
या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, हे अपहरण प्रेम प्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीच्या गर्लफ्रेंडनेच सुपारी देऊन हे कांड केलं आहे. या प्रकरणात ७ जणांना शनिवारी न्यायालयाने जामीन दिला.

नेमकं प्रकरण काय?

दिया नन्नवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०११ मध्ये दिया यांचे पहिले लग्न संतोष कंठीलाल पवार याच्यासोबत झाले होते. मात्र त्याला दारुचे व्यसन होते. दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. या कारणातून काही काळाने दिया आणि नागनाथ नन्नवरे यांचे प्रेमसंबंध जुळले. यातून दोघे ११ वर्षांपूर्वी पळून बीड येथे आले. तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत. नागनाथ याचे पूर्वी ज्योती काळे (रा. जामखेड) हिच्याशी प्रेमसंबंध होते. ती सतत नागनाथला ब्लॅकमेल करत होती. ज्योती काळेने पुण्याच्या गुंडांच्या टोळीला सुपारी देऊन हे अपहरण घडवून आणले.
advertisement

अंबी येथून तरुणाची १४ तासांनी सुटका

भरदिवसा मारहाण करुन नागनाथ यांचं जीपमधून अपहरण झाले होते. मारहाण करत अपहरण करतानाचा व्हिडिओही समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पीआय मास्ती खेडकर, एपीआय बी. बी. दराडे, पारसनाय संजय कुकलारे यांच्यासह पीएसआय श्रीराम खटावकर यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. शनिवारी अंबी येथून तरुणाची सुटका केली आहे
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
गर्लफ्रेंडने सुपारी दिली, बीडमधील अपहरणात लव्ह ट्रँगलचा ट्विस्ट, 2 प्रेयसींची भानगड अंगलट
Next Article
advertisement
Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement