Mumbai: प्रभादेवी पूल बंद, BEST बसच्या मार्गात बदल, पर्यायी मार्ग कोणते?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Traffic: प्रभादेवी पूल वाहतुकीस बंद करण्यात आला असून त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून बेस्ट बसचा मार्ग देखील बदलण्यात आला आहे.
मुंबई : जुना प्रभादेवी पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून प्रभादेवी पुलावरून धावणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यातच येत्या काही दिवसांत नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असून अनेक रुग्णांनाही त्याचा फटका बसत आहे.
बस मार्गातील बदल
प्रभादेवी पूल बंद असल्याने बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- 162 प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारत माता, संत जगनाडे चौक, साने गुरुजी मार्ग, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक, ना. म. जोशी मार्ग, दीपक सिनेमा, परळ एसटी आगार मार्गे धावेल.
बेस्ट बस मार्ग क्रमांक 168 ही प्रभादेवी पुलाऐवजी मडके बुवा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भारत माता, संत जगनाडे चौक, साने गुरुजी मार्ग, कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक, ना.म.जोशी मार्ग, दीपक सिनेमा, पांडुरन बुधकर मार्गे धावेल.
advertisement
बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- 117 प्रभादेवी पुलाऐवजी मडकेबुवा चौकातून वळण घेऊन पुढे हिंदमाता सिनेमापर्यंत बस सेवा विस्तारित करण्यात आली आहे.
बेस्ट बस मार्ग क्रमांक 201 प्रभादेवी पुलाऐवजी परळ एसटी आगार / संत रोहिदास चौक येथून वळविण्यात येईल.
advertisement
7 मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास
परळ प्रभादेवी प्रवासासाठी आधी 5 ते 7 मिनिटांचा वेळ लागत होता. आता या मार्गवरील वाहतूक करीरोड व चिंचपोकळीच्या दिशेने वळवण्यात आली आहे. त्यामुळे 2 ते 3 किमीचे अंतर जास्त जावे लागत असून वाहतूक कोंडीत वाढ झाली हे. त्यामुळे या प्रवासासाठी आता 30 मिटिनांहून अधिक वेळ लागत आहे.
advertisement
दरम्यान, प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला ब्लॉक घ्यावा लागेल. त्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येणार असून मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 9:13 AM IST