करण जौहरच्या कॉफी विथ करण 8मध्ये दीपिका आणि रणवीर यांनी चाहत्यांना त्यांच्या लग्नातील कधीच समोर न आलेले क्षण दाखवले. दीपवीरच्या साखरपुड्यापासून, मेहंदी, अनंत कारजसहीत मंडपातील महत्त्वाच्या विधींपर्यंतचे सगळे क्षण सर्वांसमोर आणले आहेत. दीपिका-रणवीरच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होऊ लागला आहे.
हेही वाचा - लग्नाच्या 3 वर्षांआधी झाला होता रणवीर-दीपिकाचा सिक्रेट साखरपुडा; अभिनेत्याच्या मनात होती 'ही' भिती
advertisement
लग्नाच्या व्हिडीओची सुरूवात रणवीर सिंहने होते.जेव्हा त्यानं 2015मध्ये मालदीवमध्ये दीपिकाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर दोघे थेट दीपिकाच्या कुटुंबाला बंगळूरूमध्ये भेटले होते. दोघांनी त्यांच्या सिक्रेट साखरपुड्याबद्दल सर्वांना सांगितलं. तेव्हा सगळे नाराज झाले होते. पण रणवीरनं त्याच्या स्वभावानं सगळ्यांशी खास नातं निर्माण केलं.
त्याचप्रमाणे व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीरच्या प्रेमाचे अनेक भावूक करणारे आणि त्याच्यातील प्रेम दाखवणारे क्षण पाहायला मिळत आहेत. दीपिकाच्या हाताला मेंहंदी लागली आहे आणि तिच्या डोळ्यात पाणी आलंय. रणवीर आपल्या बोटांनी दीपिकाच्या डोळ्यातील अश्रू पुसताना दिसत आहे. तर दीपिका तयार होताना रणवीर तिला पाहायचा वेगळाच हट्ट देखील करताना दिसत आहे. आपल्या जावयाचं प्रकाश पादुकोण यांनी खूप कौतुक देखील केलेलं पाहायला मिळतंय.
प्रकाश पादुकोण यांनी रणवीरबद्दल म्हटलंय, "आमचा जावई आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आला. रणवीर एक जिंदादिल माणूस आहे. इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. आमची चार जणांचा बोरींग फॅमिली होती. आमच्यासारख्या कुटुंबाला एक परफेक्ट जावई मिळाला आहे". तर रणवीरचे वडील जगजीत सिंह म्हणाले, "माझा मुलगा एकदा म्हणाला होता,बाबा मी एक दिवस दीपिका पादुकोणबरोबर लग्न करेन. ही डेस्टनी आहे. एका परफेक्ट स्क्रिप्ट राइटरने लिहिलेली स्क्रिप्ट आहे".