विशेष म्हणजे दीपिकानं चालत व्यंकटेश्वराचा गड पूर्ण केला. तिरूपतीमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. अशा थंडीत तिनं गुरूवारी म्हणजेच 14 डिसेंबरला रात्री गड चढण्यास सुरूवात केली. दोन तासांची चढाई करून ती मंदिर परिसरात पोहोचली. दीपिकानं गड चढत असताना ब्लॅक कलरची हुडी आणि पँट कॅरी केली. रस्त्यात दीपिक आगीजवळ हात शेकवताना देखील दिसली.
advertisement
हेही वाचा - कोणाला मिळाला नाही खांदा तर कोणाला रक्त्याच्या उल्ट्या, 4 स्वर्गाहून सुंदर अभिनेत्रींचा वेदनादायक मृत्यू
गुरूवारी रात्री 2 तासांची चढाई करून झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे दीपिका व्यंकटेश्वराच्या मंदिरात पोहोचली. दीपिका आणि तिची बहिणी अनवाणी चालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुक्रवारी पहाटे दीपिका आणि तिच्या बहिणीनं चेंजिंग करून मंदिरात प्रवेश केला आणि व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं.
दीपिकाआधी अभिनेता शाहरूख खान देखील शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला गेला होता. डंकी सिनेमाचं पोस्टर त्यानं साईबाबांच्या चरणी अर्पण केलं. शिर्डीआधी शाहरूख त्याची मॅनेजर पूजा ददलानीबरोबर वैष्णौ देवीच्या दर्शनासाठी गेला होता. शाहरूख एका वर्षात तिसऱ्यांदा वैष्णौ देवीला गेला होता.
दीपिकाचा 'फाइटर' हा सिनेमा 2024ला रिलीज होतोय. सिनेमाचं प्रमोशन सुरू झालं. रिलीजच्या आधी दीपिकानं व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. 25 जानेवारी 2023 रोजी दीपिका आणि शाहरूख खानचा पठाण हा सिनेमा रिलीज झाला होता. बरोबर याच दिवशी 25 जानेवारी 2024ला दीपिका आणि ऋतिक रोशनचा फाइटर हा सिनेमा रिलीज होतोय. फाइटरनंतर दीपिका कल्कि 2898AD आणि सिंघम अगेन सिनेमातही दिसणार आहे.