रणवीरनं सांगितलं, मी माझ्या आई आणि बहिणीला सोबत घेऊन दीपिकासाठी एक रिंग बनवली होती. त्यानंतर मी आणि दीपिका मालदीवला सुट्टीचा प्लान केला. मालदीवमध्ये मी दीपिकाला रिंग देऊन लग्नासाठी प्रपोज केलं. दीपिकानं मला तिथल्या तिथे पटकन होकार दिला. पण खरी गोष्ट तर पुढे होती.
हेही वाचा - दीपिका नाही तर 'ही' अभिनेत्री होती 'रामलीला' साठी पहिली पसंती; रणवीर सिंगचा खुलासा
advertisement
रणवीर पुढे म्हणाला, "मी दीपिकाला प्रपोज केलं तिथेच आमचा सिक्रेट साखरपुडा झाला होता. त्यानंतर मालदीववरून आम्ही थेट बंगळूरूला गेलो. मी दीपिकाला नको म्हटलं होतं पण तिनं सांगायचं असं ठरवलं होतं. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तिची फॅमिली आणि काही फॅमिली फ्रेंड्स होते. तिनं सगळ्यांना सांगितलं".
"दीपिकानं तिच्या घरी माझ्याबद्दल सांगितलं. तिच्या घरचे आनंदी होण्याऐवजी खूप नाराज झाले. कोणी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सगळे शांत होते. थोड्या वेळाने मी माझ्या घरी गेलो. तेव्हा अम्मा दीपिकाबरोबर भांडली होती. कोण आहे हा मुलगा? त्याने तुला प्रपोज केलं आणि तू त्याला हा बोलली, असं म्हणत ती तिच्यावर खूप रागवली. सुरूवातीला दीपिकाची आई आमच्या नात्यासाठी तयार नव्हती. मी दीपिकाच्या लायक होण्यासाठी खूप मेहनत घेतली. वर्षभर मी दीपिकाच्या आईची मनधरणी केली. एक वर्षांनं त्यांनी आमचं नातं स्वीकारलं. आज मी दीपिकाच्या आईचा सगळ्यात आवडता व्यक्ती आहे", असंही रणवीर म्हणाला.