धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक अफवा सुरू झाल्या. अनेकांनी धर्मेंद्र यांच्यावर इतक्या घाईघाईत अंत्यसंस्कार का करण्यात आले असा प्रश्नही उपस्थित केला. मात्र, आता 'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणाऱ्या राखी सावंतने देओल कुटुंबावर थेट गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे.
देशाच्या हिरोचे अंतिम दर्शन नाही?
राखी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत, धर्मेंद्र यांना राजकीय सन्मानाने निरोप न दिल्याबद्दल आणि चाहत्यांना त्यांच्या अंतिम दर्शनापासून वंचित ठेवल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. राखी म्हणाली, "धर्मेंद्र हे फक्त देओल कुटुंबाचे नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे हीरो होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. ते तुमचे वडील होते, आम्ही त्याचा आदर करतो. पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी आमचे हीरो होते. श्रीदेवी किंवा राजेश खन्ना यांना ज्या प्रकारे राजकीय सन्मानाने निरोप देण्यात आला, तसा सन्मान धर्मेंद्र यांना का मिळाला नाही? त्यांच्या आठवणीत एक फूलही का अर्पण केले गेले नाही?"
advertisement
देशभरातील त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांना शेवटचे पाहायचे होते, पण तसे का केले गेले नाही, असा सवाल यावेळी राखीने उपस्थित केला.
राखीच्या स्वप्नात आले होते धरमजी!
इतकेच नाही, तर राखी सावंतने धर्मेंद्र यांच्या निधनाच्या वेळेबद्दलही धक्कादायक दावा केला आहे. राखीने गंभीर आरोप केला की, "मला अनेक लोकांनी सांगितले, तसेच रुग्णालयातील डॉक्टरांनीही सांगितले की, त्यांचा मृत्यू दोन दिवस आधीच झाला होता." यासोबतच तिने अत्यंत नाट्यमय दावा करत सांगितले, "मला स्वप्नात स्वतः धरमजी आले होते!" चाहत्यांना अंतिम भेटीची संधी न मिळाल्याचे दुःख तिला वाटते, असेही ती म्हणाली.
निधनामुळे वाढदिवसाचे सेलिब्रेशन रद्द
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखी सावंतला तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशनही रद्द करावे लागले. राखी सावंतचा वाढदिवस २५ नोव्हेंबर रोजी असतो. "माझ्या वाढदिवसाची पार्टीची पूर्ण तयारी झाली होती, पण त्यांच्या निधनाची बातमी कळताच आम्ही ती तात्काळ रद्द केली," असे तिने सांगितले.
राखी सावंत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. पुन्हा एकदा तिने धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावर थेट भाष्य करून एक नवा वाद निर्माण केला आहे.
