ईशा देओलला आली वडिलांची आठवण
ईशा देओलने सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या 'इक्कीस' या शेवटच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शेवटच्या दिवसाचा आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ईशाने लिहिलं आहे,"He is the best. Love you Papa”. ईशा देओलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र 'इक्कीस'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना दिसतात आणि त्याचबरोबर आपली एक इच्छा देखील व्यक्त करतात. धर्मेंद्र म्हणत आहेत,"मॅडॉक फिल्म्ससोबत काम करून मला खूप आनंद झाला. टीम, टीमचे कॅप्टन श्रीराम जी—सगळ्यांना धन्यवाद. हा चित्रपट अतिशय छान बनवला आहे आणि मला वाटतं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी हा चित्रपट पाहायला हवा. आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मी आनंदीही आहे आणि भावूकही आहे. लव्ह यू ऑल. माझ्याकडून कुठे काही चूक झाली असेल तर कृपया माफ करा".
advertisement
चाहते भावूक
धर्मेंद्र यांचा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते भावूक झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, "धर्मेंद्र जी बॉलिवूडमधील सर्वात महान अभिनेत्यांपैकी एक होते". दुसऱ्याने लिहिलंय,"मिस यू धर्मेंद्र जी, आजही तुम्ही आठवण येते".
'इक्कीस'ची चाहत्यांना प्रतीक्षा
‘इक्कीस’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. तर अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा अगस्त्यचा दुसरा चित्रपट असला तरी मोठ्या पडद्यावरचा हा त्याचा पहिला रिलीज असेल. सिमर या चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटात अगस्त्य नंदा भारतीय सेनेचे सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत आहे. तर धर्मेंद्र त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट असल्याने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
