मक्याच्या दरात मोठी घसरण
कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, आज राज्यात मक्याची एकूण आवक 24 हजार 913 क्विंटल इतकी झाली. यामध्ये जालना कृषी बाजारात सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. जालना बाजारात आलेल्या 5 हजार 286 क्विंटल लाल मक्यास किमान 1450 रुपये, तर कमाल 1880 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, आज मक्याला सर्वाधिक बाजारभाव पुणे कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. पुणे बाजारात केवळ 3 क्विंटल मक्याच्या आवकेला किमान 2600 रुपये, तर कमाल 2800 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मात्र, शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज मक्याच्या सर्वाधिक दरात घट झाली आहे, तर काही बाजारांमध्ये मात्र इतर दरांमध्ये वाढ दिसून आली आहे.
advertisement
हळदीवर कंद माशीचा प्रादुर्भाव? असं करा नियंत्रण, तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
कांद्याच्या दरात किंचित सुधारणा
राज्यातील कृषी बाजारांमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 14 हजार 670 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. यामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली असून, तेथे 46 हजार 129 क्विंटल कांदा दाखल झाला. सोलापूर कृषी बाजारात कांद्याला किमान 100 रुपये, तर कमाल 3300 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. आज राज्यात कांद्याचा सर्वाधिक दर सोलापूर बाजारातच मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या उच्चांकी दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सोयाबीनच्या दरात पुन्हा नरमाई
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 40 हजार 546 क्विंटल इतकी झाली. यामध्ये लातूर कृषी बाजारात सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली आहे. लातूर बाजारात आलेल्या 13 हजार 559 क्विंटल सोयाबीनला किमान 3825 रुपये, तर कमाल 4675 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, नांदेड कृषी बाजारात आवक झालेल्या 451 क्विंटल सोयाबीनला आजचा सर्वाधिक 4977 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र, शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे चित्र आहे.





