मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?

Last Updated:

शनिवारी 20 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली असताना, कांदा आणि मक्याची आवक घटलेली दिसून आली.

+
News18

News18

अमरावती : राज्यातील कृषी मार्केटमध्ये शेतमालाच्या दरात आजही चढ-उतार सुरूच आहेत. आवकही कमी-जास्त होत आहे. शनिवारी 20 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये सोयाबीनची आवक वाढलेली असताना, कांदा आणि मक्याची आवक घटलेली दिसून आली. परिणामी या तिन्ही शेतमालांच्या दरांमध्येही बदल नोंदविण्यात आले आहेत. आज सोयाबीन, मका आणि कांद्याला नेमका किती दर मिळाला, ते पाहूया.
मक्याच्या दरात मोठी घसरण
कृषी मार्केटच्या अधिकृत वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, आज राज्यात मक्याची एकूण आवक 24 हजार 913 क्विंटल इतकी झाली. यामध्ये जालना कृषी बाजारात सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली. जालना बाजारात आलेल्या 5 हजार 286 क्विंटल लाल मक्यास किमान 1450 रुपये, तर कमाल 1880 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, आज मक्याला सर्वाधिक बाजारभाव पुणे कृषी बाजारात मिळाल्याचे दिसून आले. पुणे बाजारात केवळ 3 क्विंटल मक्याच्या आवकेला किमान 2600 रुपये, तर कमाल 2800 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. मात्र, शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज मक्याच्या सर्वाधिक दरात घट झाली आहे, तर काही बाजारांमध्ये मात्र इतर दरांमध्ये वाढ दिसून आली आहे.
advertisement
कांद्याच्या दरात किंचित सुधारणा
राज्यातील कृषी बाजारांमध्ये आज कांद्याची एकूण आवक 1 लाख 14 हजार 670 क्विंटल इतकी नोंदविण्यात आली. यामध्ये लाल कांद्याची सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली असून, तेथे 46 हजार 129 क्विंटल कांदा दाखल झाला. सोलापूर कृषी बाजारात कांद्याला किमान 100 रुपये, तर कमाल 3300 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. आज राज्यात कांद्याचा सर्वाधिक दर सोलापूर बाजारातच मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी मिळालेल्या दरांच्या तुलनेत आज कांद्याच्या उच्चांकी दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
advertisement
सोयाबीनच्या दरात पुन्हा नरमाई
आज राज्यातील कृषी बाजारांमध्ये सोयाबीनची एकूण आवक 40 हजार 546 क्विंटल इतकी झाली. यामध्ये लातूर कृषी बाजारात सर्वाधिक आवक नोंदविण्यात आली आहे. लातूर बाजारात आलेल्या 13 हजार 559 क्विंटल सोयाबीनला किमान 3825 रुपये, तर कमाल 4675 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. दरम्यान, नांदेड कृषी बाजारात आवक झालेल्या 451 क्विंटल सोयाबीनला आजचा सर्वाधिक 4977 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मात्र, शुक्रवारी नोंदविण्यात आलेल्या उच्चांकी दराच्या तुलनेत आज सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे चित्र आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement