16 मुरा म्हशींमधून महिन्याला लाखोंची निव्वळ कमाई, कल्याण मोरे यांची यशोगाथा

Last Updated:

गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील कल्याण मोरे हे गेल्या दोन वर्षांपासून म्हैस पालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहे. या माध्यमातून ते वर्षाकाठी लाखो रूपयांची कमाई करत असतात.

+
16

16 मुरा म्हशींचा गोठा, दररोज 120 लिटर दूध विक्री; कल्याण मोरे यांची महिन्याला 1

छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील पुरी गावातील कल्याण मोरे हे गेल्या दोन वर्षांपासून म्हैस पालन व्यवसाय करत आहे. त्यांच्याकडे मुरा या वाणाच्या 16 म्हशी आहे. दररोज यामधून 120 लिटर दुध काढले जाते. हे दूध डेअरीला विक्री करण्यात येते. या दूध विक्रीतून मोरे यांची दिवसाला 7 हजारांची तर महिन्याला 2 लाखांची उलाढाल होते आणि इतर खर्च वजा जाता निव्वळ कमाई 1 लाख रुपये होत असते. तसेच म्हैस पालन आणि दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीने करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
गंगापूर तालुक्यातील पुरी गावात 2023 मध्ये म्हैस पालन सुरू केले तसेच कल्याण मोरे सांगतात की, त्यांचे भाऊ किरण मोरे यांनी तिच्या मित्राचे म्हैस पालन व गोठा पाहिला त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून म्हैस पालन व दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मुरा या वाणाच्या 10 म्हशी हरियाणावरून आणल्या, त्यांचा सांभाळ केला. वेळेनुसार या व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत गेला त्यामुळे 1 वर्षानंतर आणखी या मशीनमध्ये वाढ करण्यात आली आणि सध्याच्या घडीला आता एकूण 16 म्हशी आहेत अशी माहिती लोकल 18 सोबत बोलताना कल्याण मोरे यांनी दिली.
advertisement
गोठ्यातील सर्व कामे हे कामगार पाहतात, तर चारा-पाणी करणे, ही कामे स्वतः मोरे करतात. तसेच जनावरांना खाद्यामध्ये, ढेप, सुग्रास, अशा प्रकारचे खाद्य दिले जाते. इतर शेतकऱ्यांना व तरुणांना हा व्यवसाय करायचा झाल्यास सर्वात अगोदर या कामाचा अनुभव असणे महत्त्वाचे आहे. तसेच मेहनत घेण्याची क्षमता पाहिजे, स्वतः काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे तेव्हा हा व्यवसाय फायदेशीर ठरत असल्याचे देखील मोरे यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
16 मुरा म्हशींमधून महिन्याला लाखोंची निव्वळ कमाई, कल्याण मोरे यांची यशोगाथा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement