"मला माफ करा", धर्मेंद्र यांनी व्यक्त केलेली शेवटची इच्छा, निधनाच्या 26 दिवसांनी VIDEO समोर

Last Updated:

Dharmendra Last Wish : धर्मेंद्र यांनी निधनाआधी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18
News18
Dharmendra : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाला 26 दिवस झाले आहेत. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' हा शेवटचा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट आधी 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. अगस्त्य नंदा आणि सिमर भाटिया अभिनीत हा चित्रपट आता 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होईल. दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून तो पाहून सगळेच भावूक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओलने ‘इक्कीस’मधील त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून ‘ही-मॅन’चे चाहते पुन्हा भावूक झाले आहेत.
ईशा देओलला आली वडिलांची आठवण
ईशा देओलने सोशल मीडियावर धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्यांच्या 'इक्कीस' या शेवटच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शेवटच्या दिवसाचा आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ईशाने लिहिलं आहे,"He is the best. Love you Papa”. ईशा देओलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र 'इक्कीस'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगताना दिसतात आणि त्याचबरोबर आपली एक इच्छा देखील व्यक्त करतात. धर्मेंद्र म्हणत आहेत,"मॅडॉक फिल्म्ससोबत काम करून मला खूप आनंद झाला. टीम, टीमचे कॅप्टन श्रीराम जी—सगळ्यांना धन्यवाद. हा चित्रपट अतिशय छान बनवला आहे आणि मला वाटतं भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी हा चित्रपट पाहायला हवा. आज शूटिंगचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मी आनंदीही आहे आणि भावूकही आहे. लव्ह यू ऑल. माझ्याकडून कुठे काही चूक झाली असेल तर कृपया माफ करा".
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by ESHA DHARMENDRA DEOL (@imeshadeol)



advertisement
चाहते भावूक
धर्मेंद्र यांचा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहते भावूक झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, "धर्मेंद्र जी बॉलिवूडमधील सर्वात महान अभिनेत्यांपैकी एक होते". दुसऱ्याने लिहिलंय,"मिस यू धर्मेंद्र जी, आजही तुम्ही आठवण येते".
'इक्कीस'ची चाहत्यांना प्रतीक्षा
‘इक्कीस’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. तर अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा अगस्त्यचा दुसरा चित्रपट असला तरी मोठ्या पडद्यावरचा हा त्याचा पहिला रिलीज असेल. सिमर या चित्रपटातून पदार्पण करत आहे. चित्रपटात अगस्त्य नंदा भारतीय सेनेचे सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारत आहे. तर धर्मेंद्र त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा धर्मेंद्र यांचा अखेरचा चित्रपट असल्याने चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
"मला माफ करा", धर्मेंद्र यांनी व्यक्त केलेली शेवटची इच्छा, निधनाच्या 26 दिवसांनी VIDEO समोर
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement