ट्रॅक्टरचे टायर्स लवकर खराब होताय का? मग या टिप्स वापराच, पैशांची होईल बचत

Last Updated:

Tractor Tips :  शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हा शेतीतील अत्यावश्यक साथीदार मानला जातो. नांगरणी, पेरणी, फवारणी, काढणीपासून ते मालवाहतुकीपर्यंत सर्वच कामांमध्ये ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते.

Tractor News
Tractor News
मुंबई : शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हा शेतीतील अत्यावश्यक साथीदार मानला जातो. नांगरणी, पेरणी, फवारणी, काढणीपासून ते मालवाहतुकीपर्यंत सर्वच कामांमध्ये ट्रॅक्टरची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, ट्रॅक्टरची खरी कार्यक्षमता ही केवळ इंजिनवर नाही, तर त्याच्या टायर्सवरही अवलंबून असते. टायर्स वेळेआधी झिजले किंवा खराब झाले, तर कामात अडथळे येतात, खर्च वाढतो आणि वेळेचे नुकसान होते. त्यामुळे ट्रॅक्टरच्या टायर्सची योग्य निगा राखणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे ठरते.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, थोडीशी काळजी आणि नियमित देखभाल केल्यास ट्रॅक्टरच्या टायर्सचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढवता येते. यामुळे डिझेलची बचत होते, कामाचा वेग टिकून राहतो आणि शेतीचा एकूण खर्च कमी होतो. ट्रॅक्टर टायर्स दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
advertisement
नियमित तपासणी
सर्वात महत्त्वाचे म्हणजे टायर्सची नियमित तपासणी. दररोज काम सुरू करण्यापूर्वी आणि कामानंतर टायर्सची पाहणी करणे उपयुक्त ठरते. टायर्सवर कट, फुगे, भेगा किंवा दगड, खिळे अडकलेले असतील, तर ते त्वरित काढून टाकावेत. लहान नुकसान वेळेवर दुरुस्त केल्यास मोठ्या अपघातांपासून बचाव होतो.
advertisement
हवेचा दाब योग्य ठेवणे
योग्य हवेचा दाब राखणे ही टायर्सच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कमी हवेच्या दाबामुळे टायर्सवर जास्त घर्षण होते आणि ते लवकर झिजतात. तर जास्त दाब असल्यास पकड कमी होते आणि ट्रॅक्टर घसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे उत्पादक कंपनीने सुचविलेल्या हवेच्या दाबानुसार टायर्स फुगवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टरवर जादा भार टाकणे टाळावे.
advertisement
टायर्सचे रोटेशन करा
टायर्सची समान झीज होण्यासाठी वेळोवेळी टायर रोटेशन करणे फायदेशीर ठरते. ट्रॅक्टरच्या मागील टायर्सवर जास्त भार येत असल्याने ते लवकर झिजतात. पुढील आणि मागील टायर्सची अदलाबदल केल्यास झीज समान प्रमाणात होते आणि टायर्सचे आयुष्य वाढते.
advertisement
चाकांचे संतुलनही तितकेच महत्त्वाचे आहे. ट्रॅक्टर चालवताना कंप जाणवत असल्यास किंवा तो डळमळीत चालत असल्यास चाकांचे संतुलन बिघडलेले असू शकते. असंतुलित चाके टायर्सवर असमान ताण देतात, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर चाकांचे संतुलन तपासणे आवश्यक आहे. 
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ट्रॅक्टरचे टायर्स लवकर खराब होताय का? मग या टिप्स वापराच, पैशांची होईल बचत
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement