शरीरावरील 'या' खास खुणा उलगडतात भूतकाळातील रहस्य, तुमच्या अंगावर आहेत का 'असे' निशाण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आपल्या शरीरावर असलेल्या जन्मखुणा केवळ त्वचेवरचे डाग नसतात, तर त्यामागे अनेक रहस्ये दडलेली असतात, असे मानले जाते. 'सामुद्रिक शास्त्र' आणि अनेक आध्यात्मिक सिद्धांतानुसार, शरीरावरील या खुणांचा थेट संबंध आपल्या मागच्या जन्माशी असतो
आपल्या शरीरावर असलेल्या जन्मखुणा केवळ त्वचेवरचे डाग नसतात, तर त्यामागे अनेक रहस्ये दडलेली असतात, असे मानले जाते. 'सामुद्रिक शास्त्र' आणि अनेक आध्यात्मिक सिद्धांतानुसार, शरीरावरील या खुणांचा थेट संबंध आपल्या मागच्या जन्माशी असतो. या खुणा म्हणजे मागील जन्मातील काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा, अनुभव किंवा मिळालेल्या जखमांच्या खुणा असू शकतात.
advertisement
कपाळावर किंवा चेहऱ्यावर खूण : कपाळाच्या मध्यभागी जन्मखूण असणे हे बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की, अशा व्यक्तीने मागील जन्मात ज्ञानाच्या क्षेत्रात मोठे कार्य केलेले असते. तर चेहऱ्यावर खूण असलेल्या व्यक्ती अत्यंत भावूक आणि बोलक्या असतात. अशा व्यक्तींना या जन्मात अमाप संपत्ती आणि सुख मिळते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विशिष्ट आकाराच्या खुणा : जर जन्मखूण तलवारीसारखी, बाणासारखी किंवा वर्तुळाकार असेल, तर ते मागील जन्मातील युद्धाशी संबंधित मृत्यू किंवा संघर्षाचे प्रतीक मानले जाते. हे त्या आत्म्याने मागील जन्मात दिलेला पराक्रम दर्शवते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)










