12 सप्टेंबर शुक्रवारी पहाटे 4.30 वाजता बरेली येथील दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यावेळी तिचे आई-वडील आणि मोठी बहीण खुशबू पटानी घरात होते. घराबाबेर बाहेर 2 राउंड गोळीबार झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
advertisement
हल्लेखोरांचा सीसीटीव्ही व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, 2 दरोडेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला. ते दिल्ली-लखनौ महामार्गावरून आले होते आणि घटना घडवून 7-8 मिनिटांत शहर सोडून गेले. पोलीस सध्या अभिनेत्रीच्या घरापासून महामार्गापर्यंतच्या CCTV फुटेजची तपासणी करत आहेत.
आधी झाली होती घराची रेकी
तपासात असेही समोर आले आहे की गोळीबार करण्यापूर्वी हल्लेखोरांनी दिशा पटानीच्या घराची रेकी केली होती. या घटनेत 2/3 गोळ्या झाडल्या गेल्या असून पोलिसांना 7 राउंड गोळीबार झाल्याचा संशय आहे.
पोलिसांचे अधिकृत निवेदन
बरेली पोलिसांचे SP अनुराग आर्य यांनी या घटनेवर निवेदन दिले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे Twitter) वर एक व्हिडिओ शेअर करत घटना गंभीर असल्याचे सांगितले.
खुशबू पटानीच्या वादग्रस्त पोस्टमुळे वाद?
जुलै महिन्यात दिशाची बहिण खुशबू पटानीने इन्स्टाग्राम स्टोरीवरून कथावाचक अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल काही वादग्रस्त टिप्पणी केली होती. सुरुवातीला तिची टिप्पणी प्रेमानंद जी महाराजांशी जोडली गेली आणि मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर खुशबूने व्हिडिओ जारी करून स्पष्टीकरण दिले की तिचा उद्देश अनिरुद्धाचार्यांविषयी होता.
सोशल मीडियावर दिले धमकीचे निवेदन
या वादानंतर खुशबू पटानीवर लक्ष्य साधले गेले. तिच्या पोस्टनंतर काही दिवसांनी वीरेंद्र चरण आणि महेंद्र सरन या गुंडांनी सोशल मीडियावर धमकीचे निवेदन जारी केले. त्यानंतरच बरेलीतील दिशा पटानीच्या घरी गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. अशीही माहिती समोर आली आहे की USAमध्ये असलेला कुख्यात गुंड रोहित गोदारा गोल्डी बरार गँगने स्वत: वॉइस मेसेज करत दिशा पटाणीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.