TRENDING:

मृण्मयी देशपांडेच्या अडचणी वाढल्या, 'मना'चे श्लोक' चित्रपटावर बॅनची टांगती तलवार, काय आहे नेमका वाद?

Last Updated:

Manache Shlok Marathi Movie : मृण्मयी देशपांडेचा 'मनाचे श्लोक' हा सिनेमा वादात अडकलेला पाहायला मिळतोय. या सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवण्यात आला असून थेट चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी आता केली जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन विषयांवर आधारित अनेक चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. गुलकंद, आता थांबायचं नाय, दशावतार यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली, तर बिन लग्नाची गोष्ट, आरपार या सिनेमांमधून नातेसंबंधांवर आधारित प्रश्नांवर अलगद हात घालण्यात आला आहे. लवकरच मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटातूनही प्रेम, लग्न, भावना या गोष्टी नव्या पद्धतीने मांडण्यात येणार आहेत. मात्र, सिनेमाचं प्रमोशन सुरू असतानाच एक नवा वाद सुरू झाला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीजवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
News18
News18
advertisement

मागील काही वर्षांमध्ये चित्रपटांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींवरून गदारोळ होताना आपण पाहत आहोत. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये दाखवण्यात येणारे सीन्स, कलाकारांनी घातलेले कपडे, सिनेमांमध्ये देण्यात येणारे संदर्भ न पटल्यामुळे थेट चित्रपट बॉयकॉट करण्याची धमकीही दिली जाते. अशाच वादात आता मृण्मयी देशपांडेचा 'मनाचे श्लोक' हा सिनेमा अडकलेला पाहायला मिळतोय. या सिनेमाच्या नावावर आक्षेप नोंदवण्यात आला असून थेट चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी आता केली जात आहे.

advertisement

एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, चढावी लागली कोर्टाची पायरी; बाळासाहेबांनी मिटवलं प्रकरण

चित्रपटाला का होतोय विरोध?

सज्जन गड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने ‘मनाचे श्लोक’ या सिनेमाच्या नावाला विरोध केला आहे. 'मनाचे श्लोक' या पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर सिनेमासाठी केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवित्र ग्रंथाच्या नावाचा वापर, मनोरंजनासाठी, काल्पनिक गोष्टींसाठी नको, अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटाचं नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीनं देण्यात आला आहे. तथापि, अद्याप या प्रकरणी सिनेमाची टीम किंवा मृण्मयी देशपांडे हिच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीये.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत व्यवसायिकांना पैसे कमवायची संधी, 50 रुपयांपासून मिळतायत आकर्षक लाईटिंग
सर्व पहा

दरम्यान, 'मनाचे श्लोक' हा सिनेमा कौटुंबिक असून तो नातेसंबंधांवर आधारित आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडेनेच केलं असून या चित्रपटात तिच्यासोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
मृण्मयी देशपांडेच्या अडचणी वाढल्या, 'मना'चे श्लोक' चित्रपटावर बॅनची टांगती तलवार, काय आहे नेमका वाद?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल