TRENDING:

Busenees Idea : दिवाळीत व्यवसायिकांना पैसे कमवायची उत्तम संधी, 50 रुपयांपासून मिळतायत आकर्षक लाईटिंग, खरेदीसाठी लोकेशन पाहा

Last Updated:

दिवाळीचा सण जवळ येत असून या आनंदाच्या सणात घर, ऑफिस आणि दुकाने रंगीबेरंगी आणि आकर्षक सजवण्याची तयारी जोरात सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दिवाळीचा सण जवळ येत असून या आनंदाच्या सणात घर, ऑफिस आणि दुकाने रंगीबेरंगी आणि आकर्षक सजवण्याची तयारी जोरात सुरू आहे. या काळात लोक कमी किमतीत दर्जेदार आणि सुंदर सजावटीचे साहित्य शोधत असतात. अशाच पार्श्वभूमीवर मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटजवळील लोहार चाळीत असलेले सद्गुरू कृपा लाइट्स हे दुकान सजावटीसाठी विविध प्रकारचे लाईट्स, घुंबर, पाट्या, मेनबत्ती लाईट्स आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देत आहे.
advertisement

या दुकानात दिव्याच्या आकाराच्या रंगीबेरंगी लाईट्स फक्त 50 रुपयांपासून सुरू होतात. या व्यतिरिक्त हॅपी दिवाळी आणि शुभ दीपावली अशा शुभेच्छा लिहिलेल्या लाईट्स, पारंपरिक घुंबर, मिनी एलईडी लाईट्स आणि इतर अनेक प्रकारचे दिवाळी सजावटीचे साहित्य येथे 50 रुपये ते 1000 रुपयांच्या दरम्यान मिळते. त्यामुळे ग्राहकांच्या विविध गरजा आणि बजेटनुसार पर्याय उपलब्ध आहेत.

advertisement

Diwali 2025: दिवाळी शॉपिंगसाठी मुंबईत जबरदस्त ठिकाण, इथे मिळतायत 200 रूपयात सुंदर कुर्ते

एक बॉक्स ज्यात 24 मेनबत्ती लाईट असतात तो फक्त 220 रुपयांत विकला जातो. तसेच, 3 स्टेप, 4 स्टेप, 5 स्टेप अशा समई लाईट्स देखील येथे 200 ते 300 रुपयांदरम्यान मिळतात. हॅपी दिवाळी आणि शुभ दीपावली लिहिलेल्या पाट्यांची किंमत 750 रुपये आहे. पारंपरिक घुंबर 60 रुपयांपासून सुरू होऊन 1000 रुपयांपर्यंत विविध प्रकारात उपलब्ध आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत व्यवसायिकांना पैसे कमवायची संधी, 50 रुपयांपासून मिळतायत आकर्षक लाईटिंग
सर्व पहा

दिव्यांच्या आकारातील 2 मीटर लांब लाईटिंगची किंमत फक्त 50 रुपये असून, त्यासाठी किमान 10 बॉक्स खरेदी करणे आवश्यक आहे. या लाईट्सचा वापर घर, ऑफिस, दुकान आणि सार्वजनिक ठिकाणी सुंदर आणि आकर्षक सजावटीसाठी केला जातो. हे सर्व साहित्य मंगलदास बिल्डिंग नंबर 5, तिसरा मजला, लोहार चाळ, मुंबई येथे सहज उपलब्ध आहे. कमी दरात दर्जेदार साहित्य मिळत असल्यामुळे सजावट करणाऱ्यांसाठी तसेच व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही एक उत्तम संधी आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Busenees Idea : दिवाळीत व्यवसायिकांना पैसे कमवायची उत्तम संधी, 50 रुपयांपासून मिळतायत आकर्षक लाईटिंग, खरेदीसाठी लोकेशन पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल