TRENDING:

'हाच खरा डाउनफॉल', करोडोंची मर्सिडीज सोडून टॅक्सीमध्ये फिरतोय गोविंदा, शाळेच्या कार्यक्रमात डान्स करतानाचा VIDEO VIRAL

Last Updated:

Govinda: ९० च्या दशकात ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्ख्या बॉक्स ऑफिसची गणितं ठरायची, तो गोविंदा आज कोणत्या परिस्थितीतून जातोय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ९० च्या दशकात ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्ख्या बॉक्स ऑफिसची गणितं ठरायची, तो गोविंदा आज कोणत्या परिस्थितीतून जातोय? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे. लग्झरी गाड्यांचा ताफा आणि बॉडीगार्ड्सच्या गराड्यात फिरणारा हा सुपरस्टार चक्क एका साध्या टॅक्सीत बसून प्रवास करताना दिसला. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये गोविंदाचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली असून, "बॉलिवूडच्या यशस्वी हिरोसोबत असं कसं होऊ शकतं?" असा सवाल विचारला जात आहे.
News18
News18
advertisement

स्टेज शो आणि शाळेची स्नेहसंमेलनं

गोविंदा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी तो छोटे-मोठे इव्हेंट्स आणि शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनांमध्ये हजेरी लावताना दिसतोय. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील 'संगम इंटरनॅशनल स्कूल'मध्ये गोविंदाने चक्क ब्लॅक अँड व्हाईट कपड्यांमध्ये मंचावर जाऊन 'मैं तो रस्ते से जा रहा था' गाण्यावर डान्स केला. शाळेच्या लहान मुलांसमोर गोविंदाला डान्स करताना पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं, तर काहींनी म्हटलं की, "इतक्या मोठ्या स्टारला आता हे करावं लागतंय का?"

advertisement

गोविंदाची हालत पाहून चाहत्यांना धक्का!

नुकताच गोविंदाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो आग्र्याच्या एअरपोर्टवरून बाहेर येताना दिसतोय. तिथे त्याचं स्वागत होतं, पण त्यानंतर तो एका पांढऱ्या रंगाच्या साध्या टॅक्सीत बसतो. विशेष म्हणजे त्या गाडीवर 'भारत सरकार' असं लिहिलेलं आहे. कधीकाळी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडीशिवाय खाली न उतरणाऱ्या गोविंदाला अशा साध्या कारमध्ये पाहून नेटकऱ्यांनी 'डाऊनफॉल' अशा कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलंय, "हा आमचा हिरो नंबर १ आहे, तो हे सगळं डिझर्व्ह करत नाही."

advertisement

"माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जातंय!" गोविंदाचा खळबळजनक आरोप

'एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने आपल्या संघर्षावर भाष्य केलं. तो म्हणाला, "प्रसिद्धी आणि संपत्ती कधीच कोणाला सोडत नाही. माझ्याविरुद्ध जाणीवपूर्वक षडयंत्र रचलं जातंय. हे कोणासोबतही होऊ शकतं. एका खूप मोठ्या अभिनेत्यासोबत हे आधी घडलं आहे आणि आता माझ्यासोबत होतंय. लोकांनी माझ्या शांत राहण्याला माझी कमजोरी समजलं आहे. मी केवळ देवाकडे प्रार्थना करतोय की त्याने मला आणि माझ्या मुलांना या संकटातून बाहेर काढावं."

advertisement

नेमकं सत्य काय?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले, डाळिंब तेजीत, हळदीनंही मार्केट खाल्लं, कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

काही जणांचं म्हणणं आहे की, एअरपोर्टवर खासगी गाड्यांच्या एन्ट्रीला मर्यादा असल्यामुळे गोविंदाने सरकारी गाडीचा वापर केला असावा. पण ज्या पद्धतीने गोविंदा शाळेच्या इव्हेंट्सना हजेरी लावतोय आणि मुलाखतींमध्ये षडयंत्राची भाषा करतोय, ते पाहता पडद्यामागचं काहीतरी वेगळं शिजतंय, असंच वाटतंय.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'हाच खरा डाउनफॉल', करोडोंची मर्सिडीज सोडून टॅक्सीमध्ये फिरतोय गोविंदा, शाळेच्या कार्यक्रमात डान्स करतानाचा VIDEO VIRAL
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल