आठ तासांच्या वर्क कल्चरबद्दल सौरभ शुक्ला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्याने उत्तर दिले की, कामाच्या वेळेसाठी मानवी मर्यादा असल्या तरी, सर्वांना समान मानकांवर ठेवणे अन्याय्य आहे. त्याच्यासाठी, कठोर क्रिएटिव्ह फ्लो जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही कामाच्या ओघात असाल तर मला खरं वाटतं की तुम्ही अचानक आपल्या कामापेक्षा अर्धा तास किंवा एक तास जास्त काम करू शकता. तुम्ही आपल्या कामाबाबतीत तक्रार करू शकत नाहीत. कारण तुम्हाला त्या कामाच्या ओघात खूप काही शिकायला मिळतं. विचारांची आणि प्रवाहाची सातत्यता तुम्हाला अनुभवायला मिळते, शिकायला मिळते."
advertisement
गेल्या काही दिवसांपासून इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सेलिब्रिटींकडून सुरू असलेल्या वर्ककल्चरबद्दल त्यांनी भाष्य केले. युक्तीवादाबद्दल त्यांची वस्तुस्तिथी होती. कलाकारांचे अंतिम लक्ष्य ठरलेले असायला हवे. आपण काम किती वेळ केलं? कशापद्धतीने केलंय? यावर लक्ष द्यायला हवं. घड्याळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी 'अरे! 6 वाजले, 8 वाजले आणि मला घरी जायचे आहे.' याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही करत असलेल्या कामावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. ते कशापद्धतीने वेगळ्या पद्धतीने करेल, याकडे लक्ष द्या.' बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कामाचे तास नियंत्रित करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्या दृष्टीने त्यांनी हे विधान केले आहे.
सौरभ शुक्ला एक अभिनेता असण्यासोबतच एक प्रसिद्ध दिग्दर्शक सुद्धा आहेत. गेल्या काळापासून त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. "होय, गेल्या अनेक दिवसांपासून मी चित्रपटांचे दिग्दर्शन करत नाहीये. कारण, माझ्या चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी कोणताही निर्माता पुढे आला नाही. माझा चित्रपटांची निर्मिती करा मी दिग्दर्शन करतो." ए.आर. रहमान यांच्या विधानावर सौरभ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संगीतकार ए.आर. रहमान यांनी अलीकडेच चित्रपटसृष्टीतील "जातीयवाद" आणि "सत्ता बदल" बद्दल एक विधान केले होते, ज्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. सौरभ शुक्ला यांनी हा मुद्दा वैयक्तिक न करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले, "मी ऐकले आहे की तीन प्रकारचे संभाषण असतात. एक म्हणजे जेव्हा तुम्ही लोकांबद्दल बोलता, एक म्हणजे जेव्हा तुम्ही घटनांबद्दल बोलता आणि एक म्हणजे जेव्हा तुम्ही कल्पनांबद्दल बोलता. या संभाषणांमध्ये एक पदानुक्रम असतो. मला वाटते की मी तिसरा पर्याय निवडेन. विचारांबद्दल बोलूया, लोकांबद्दल नाही."
