एका व्लॉगमध्ये फराह आणि दिलीप राघव जुयालच्या घरी जाताना दिसले. त्यांनी त्याच्या घरी जाऊन दुपारचे जेवण केले. तेव्हाच ती आनंदाची बातमी दिलीपने सांगितली. दिलीप म्हणाला, "आमचा शो खूप छान चालत आहे. मॅमने माझा पगारही वाढवला आहे. मी खूप आनंदी आहे. तुम्ही लोकं मॅमला सांगू नका.आता मी रडलो तर पगार अजून वाढेल." ही दिलीपची व्हिडिओ खूप वायरल झाली होती.
advertisement
60 कोटींच्या वादात अडकलेली शिल्पा शेट्टी एका रात्रीत कमावते 2 कोटी, 'बॅस्टियन'चं सिक्रेट आलं बाहेर
दोघांचे नाते चांगले आहे
त्यानंतर फराह आणि दिलीपची बाँडिंग चांगला असलेली पाहायला मिळते. जेव्हा फराह किचन मधून बाहेर आली, तेव्हा दिलीप उदास ऊभा होता.vफराह म्हणाली, "तुला काय झाले, तू का रडतो आहेस ?" दिलीप हसून म्हणाला, "मॅम माझा पगार वाढवा". फराह लगेच म्हणाली की, "आत्ताच वाढवला आहे, सोड हा माणूस कधी आनंदी नसतो."
25 लाख सबस्क्राइबर
फराह खानच्या यूट्यूब चॅनलचे 25 लाख सबस्क्राइबर झाले आहेत. एवढंच नाही तर त्यांचे व्लॉग हे 15 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत. त्यात राघवनेही दिलीपचं कौतूक करत त्याला व्हिडिओमध्ये स्टार म्हटले आहे. दिलीपचा साधेपणा आणि गंमती यांमुळे त्या दोघांचे नाते प्रेक्षकांना आवडते. फराह सोबत दिलीपने अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सच्या घरी पाहुणचार केला आहे.
