TRENDING:

Don 3 मधून विक्रांत मेस्सी Out! 'बिग बॉस'चा विनर बनणार नवा व्हिलन? थेट रणवीर सिंगला भिडणार

Last Updated:

Don 3 Updates : रणवीर सिंगच्या 'डॉन ३' मध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मेस्सीने काढता पाय घेतल्याचं कळलं. दरम्यान, निर्मात्यांना व्हिलन म्हणून नवा चेहरा सापडला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे ती रणवीर सिंगच्या 'डॉन ३' या चित्रपटाची. शाहरुख खानची जागा रणवीरने घेतल्यापासून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी होती की, चित्रपटात खलनायकाची भूमिका विक्रांत मेस्सी साकारणार आहे. पण नंतर त्याने 'डॉन ३' मधून काढता पाय घेतल्याचं कळलं. आता मात्र निर्मात्यांची चिंता दूर झाली असल्याचं दिसतंय. असं म्हटलं जात आहे की 'डॉन ३' साठी निर्मात्यांना व्हिलन म्हणून नवा चेहरा सापडला आहे.
News18
News18
advertisement

Don 3 मध्ये कोण घेणार विक्रांत मेस्सीची जागा?

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'बिग बॉस १८' चा विजेता करणवीर मेहरा असल्याचं सांगितलं जात आहे. नुकतंच करण वीर मेहराला एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं आणि चर्चा अशी आहे की तोच आता या थ्रिलर चित्रपटात प्रमुख खलनायक म्हणून दिसणार आहे! इंडस्ट्रीतील एका जवळच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण नुकताच करणवीर मेहराचा 'सिला' या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला, जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यामुळे, त्याला 'डॉन ३' मध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारले जाण्याची दाट शक्यता आहे."

advertisement

Saif Ali Khan Attack : सैफवर झालेला हल्ला काल्पनिक, कोर्टातून आली मोठी अपडेट! आरोपीला जामीन मिळणार?

करणवीरने सोशल मीडियावर 'जहराक' नावाच्या खलनायकाचा आपला फर्स्ट लूक शेअर केला होता. त्यात तो रक्ताने माखलेला, लांब, विस्कटलेले केस आणि हातात तलवार घेऊन दिसत होता. या फोटोला त्याने 'खुद ही खुदा, खुद ही इंसाफ!' असं दमदार कॅप्शन दिलं होतं. 'मेरी कोम' आणि 'सरबजीत' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'सिला' चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सादिया खतीब प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या करणवीर या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

advertisement

फरहान अख्तर Don 3 मध्ये दिसणार रणवीर-क्रितीची फ्रेश जोडी

फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन ३' हा या लोकप्रिय ॲक्शन फ्रँचायझीमधील तिसरा चित्रपट आहे. हा चित्रपट डिसेंबर २०२६ पर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या फ्रँचायझीची सुरुवात १९७८ साली अमिताभ बच्चन यांच्या 'डॉन' या क्लासिक चित्रपटाने झाली होती. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या 'डॉन: द चेज बिगिन्स' या रिमेकमध्ये शाहरुख खानने प्रमुख भूमिका साकारली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता 'डॉन ३' मध्ये रणवीर सिंगसोबत मुख्य अभिनेत्री म्हणून क्रिती सेनन दिसणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

करणवीर मेहराची 'डॉन ३' मध्ये एन्ट्री ही त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. त्याच्या दमदार खलनायकी व्यक्तिमत्त्वाला 'डॉन'च्या विश्वात पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. चाहते आता चित्रपटाशी संबंधित अधिकृत घोषणांची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'डॉन ३' मध्ये खलनायक म्हणून कोण दिसणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे!

मराठी बातम्या/मनोरंजन/
Don 3 मधून विक्रांत मेस्सी Out! 'बिग बॉस'चा विनर बनणार नवा व्हिलन? थेट रणवीर सिंगला भिडणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल