गावात रंगलं ३५० महिलांचं हळदी-कुंकू
सासूबाईंची इच्छा शिरसावंद्य मानून अंकिताने यंदाची संक्रांत सासरच्या गावी साजरी केली. घराच्या प्रवेशद्वारावर 'अंकिता व कुणालची पहिली मकर संक्रात' असा बोर्ड लावून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. अंकिताने साडीला फाटा देत काळ्या रंगाचा स्टायलिश लेहेंगा परिधान केला होता. हलव्याच्या दागिन्यांनी सजलेली अंकिता खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे, तिने गावातल्या तब्बल ३५० महिलांना हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करून एक मोठा सोहळाच पार पाडला. या सगळ्यात तिला तिची सासू आणि जाऊबाईंची मोलाची साथ लाभली.
advertisement
अंकिताच्या 'त्या' वाक्याने वेधलं लक्ष
खरा धमाका झाला तो अंकिताने कुणालसोबत शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये अंकिता गप्पा मारताना कुणालला म्हणते, "मी कुणालला आधीच सांगितलंय, हा मी ऑर्गनाइझ केलेला शेवटचा इव्हेंट असू दे." त्यावर कुणालने दिलेलं उत्तर अधिकच हटके होतं. तो म्हणाला, "चोर ओटीचा इव्हेंट मात्र मीच करणार आहे!"
आधी नको नको ते बोलली, मग कोपऱ्यात ढसाढसा रडली! तन्वीला पाहून सागर कारंडेने दिली अशी रिॲक्शन, VIDEO
अंकिता पुढे लाडात येऊन म्हणाली, "मला तेच हवंय, नाहीतर माझ्या डोहाळे जेवणाला सुद्धा मीच सांगत बसेन की इथे फुलं लावा आणि तिथे ते लावा!" असं बोलताना ती कमरेवर हात ठेवून गरोदर महिलेची अॅक्टिंग करताना दिसतेय. या संवादानंतर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिताने डोहाळे जेवण आणि चोर ओटीचा उल्लेख केल्यामुळे ती गरोदर आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव
हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस पडला आहे. "कोकण हार्टेड गर्ल लवकरच आई होणार का?", "अंकिता, तू आम्हाला इनडायरेक्टली गुड न्यूज दिलीस का?" अशा असंख्य कमेंट्स अंकिताच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत. जरी अंकिता आणि कुणालने यावर अद्याप शिक्कामोर्तब केलं नसलं, तरी त्यांच्या संवादातून चाहत्यांना गोड बातमीचे संकेत मिळाले आहेत.
