आधी नको नको ते बोलली, मग कोपऱ्यात ढसाढसा रडली! तन्वीला पाहून सागर कारंडेने दिली अशी रिॲक्शन, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
'बिग बॉस मराठी ६' च्या पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये वादाचा असा काही भडका उडाला की, अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर सागर कारंडे पहिल्यांदाच संतापलेल्या रुपात पाहायला मिळाला.
मुंबई: मकर संक्रांतीचा सण आणि बिग बॉसचं घर... तीळ-गुळ घेऊन गोड गोड बोलण्याच्या सणात या घरात मात्र एकमेकांचे गळे कापण्याची तयारी सुरू झाली आहे. 'बिग बॉस मराठी ६' च्या पहिल्याच नॉमिनेशन टास्कमध्ये वादाचा असा काही भडका उडाला की, अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर सागर कारंडे पहिल्यांदाच संतापलेल्या रुपात पाहायला मिळाला. निमित्त ठरलं ते म्हणजे नवख्या स्पर्धक तन्वीने दिलेलं नॉमिनेशन आणि त्यानंतर झालेली शाब्दिक चकमक.
तन्वीचा वार अन् सागरचा प्रहार
नॉमिनेशनसाठी पतंग कापण्याचा टास्क देण्यात आला होता. ज्या सदस्याचा खेळ आवडत नाही, त्याचा पतंग कापून तो बॉक्समध्ये टाकायचा, असा हा खेळ. तन्वीने थेट सागर कारंडेचा पतंग कापला आणि म्हणाली, "सागर कारंडे या शोसाठी पूर्णपणे अपात्र आहेत!" हे ऐकताच शांत स्वभावाच्या सागरचा पारा चढला. तो वैतागून म्हणाला, "एवढी तर अक्कल पाहिजे ना, काय बोलतोय आपण... नॉन्सेन्स!" त्यावर तन्वीही मागे हटली नाही. ती मोठ्या आवाजात म्हणाली, "हो मी आहे नॉन्सेन्स, तुम्ही सांगायची गरज नाही." यानंतर दोघांमध्ये जबरदस्त वाजलं. सागरचा आवाज चढताच तन्वी म्हणाली, "एऽऽ... आवाजाला मी घाबरत नाही, तू काय मला शिकवणार?" या वादाने घरातलं वातावरण चांगलंच तापलं.
advertisement
advertisement
नेटकऱ्यांनी घेतली तन्वीची शाळा
या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांनी तन्वीवर टीकेचा वर्षाव केला आहे. सागर कारंडे हा महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि आदरणीय कलाकार असताना, तन्वीने त्याच्याशी ज्या भाषेत संवाद साधला, तो चाहत्यांना रुचलेला नाही. एका युझरने लिहिलं, "हिला मोठ्यांशी कसं बोलायचं याची अक्कल नाहीये." दुसऱ्याने टोला लगावला, "पहिल्या दिवसापासून तन्वीची ओव्हरॲक्टिंग सुरू झाली आहे.", "सागरला पूर्ण सपोर्ट, आधी शिष्टाचार शिकून ये!" अशा कमेंट्सने कमेंट बॉक्स भरून गेला आहे.
advertisement
बेडवर ढसाढसा रडली तन्वी
मात्र, हे भांडण विकोपाला गेल्यानंतर घरामध्ये एक वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला. काही वेळातच तन्वी कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडू लागली. तिचे डोळे सुजले होते आणि तिला रडू आवरत नव्हतं. ज्या सागरशी तिने पंगा घेतला, तोच सागर मात्र शेवटी हळवा झालेला दिसला.
advertisement
तन्वीला रडताना पाहून सागर म्हणाला, "बिचारी... मला तिचं वाईट वाटतंय. हे सगळं इतरांना सांगण्यापेक्षा तिने एकदा मला येऊन सांगितलं असतं, तर मी तिला पूर्णपणे हलकं केलं असतं." मतभेद विसरून घरातील सदस्यांनी शेवटी तन्वीला सावरलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी नको नको ते बोलली, मग कोपऱ्यात ढसाढसा रडली! तन्वीला पाहून सागर कारंडेने दिली अशी रिॲक्शन, VIDEO










