Snake Egg : सापाची अंडी खाल्ली तर काय होईल? 5 अंडी खाल्ल्याने खरोखरच मृत्यू होतो का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
भुर्जी असो किंवा मॅगीमध्ये टाकलेलं अंडं खवय्यांसाठी हा प्रथिनांचा सर्वात स्वस्त आणि मस्त स्रोत आहे. अनेकजण बदक किंवा शहामृगाची अंडीही आवडीने खातात. पण, कधी तुमच्या मनात विचार आला आहे का की, सापाची अंडी (Snake Eggs) खाल्ली तर काय होईल?
advertisement
अंड्यांची क्रेझ जबरदस्त आहे. ऑम्लेट, भुर्जी असो किंवा मॅगीमध्ये टाकलेलं अंडं खवय्यांसाठी हा प्रथिनांचा सर्वात स्वस्त आणि मस्त स्रोत आहे. अनेकजण बदक किंवा शहामृगाची अंडीही आवडीने खातात. पण, कधी तुमच्या मनात विचार आला आहे का की, सापाची अंडी (Snake Eggs) खाल्ली तर काय होईल? सोशल मीडियावर अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की, सापाची 5 अंडी एकत्र खाल्ल्यास माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे, हे जाणून घेऊया.
advertisement
सापाच्या अंड्यांमध्ये विष असतं का?अनेक लोकांचा असा समज असतो की सापाच्या अंड्यांमध्ये विष असतं, पण हे पूर्णपणे खरं नाही. मध्यप्रदेशातील खरगोन येथील सर्पमित्र आणि तज्ज्ञ महादेव पटेल यांच्या मते, सापाचे विष हे त्याच्या दातांच्या मागे असलेल्या ग्रंथींमध्ये तयार होते, अंड्यांमध्ये नाही. त्यामुळे सापाची अंडी खाल्ल्याने शरीरात विष चढून मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. मात्र, जर अंड्यामध्ये सापाचा गर्भ पूर्णपणे विकसित झाला असेल, तर परिस्थिती बदलू शकते.
advertisement
सापाची अंडी खाणं का ठरू शकतं धोक्याचं?जरी विष नसलं, तरी सापाची अंडी खाणं हे आरोग्यासाठी अनेक समस्या निर्माण करू शकतं. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.1. बॅक्टेरिया आणि संसर्ग: सापाच्या अंड्यांमध्ये 'साल्मोनेला' (Salmonella) सारखे घातक बॅक्टेरिया असू शकतात. यामुळे अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होण्याची दाट शक्यता असते.3. एलर्जी: काही लोकांना सापाच्या अंड्यांमधील प्रथिनांची ॲलर्जी असू शकते. यामुळे अंगावर रॅशेस येणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे (Anaphylaxis) यांसारखे गंभीर प्रकार घडू शकतात.3. परजीवी (Parasites) : वन्य जीवांच्या अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे परजीवी असतात, जे मानवी शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात.
advertisement
advertisement
भारताचा कायदा काय सांगतो?भारतात सापाची अंडी खाण्याचा विचार करणं सुद्धा महागात पडू शकतं. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 (Wildlife Protection Act 1972) नुसार, कोणत्याही वन्यजीवाला किंवा त्यांच्या अंड्यांना हानी पोहोचवणे हा दखलपात्र गुन्हा आहे. यासाठी तुम्हाला दंड किंवा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. धार्मिक दृष्टिकोनातूनही भारतात सापाला पुजले जाते, त्यामुळे अशा गोष्टींना समाजात स्थान नाही.थोडक्यात सांगायचं तर, सापाची अंडी खाल्ल्याने लगेच मृत्यू होत नाही, पण संसर्ग आणि कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती मात्र 100 टक्के असते. त्यामुळे प्रथिनांसाठी कोंबडीची अंडीच सर्वोत्तम आहेत.









