शेरीका डी अरमासच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून उरुग्वे आणि जगभरात शोककळा पसरली आहे. तिचा भाऊ मायाक डी अरमासने तिच्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या लाडक्या बहिणीसाठी लिहिलंय की, "आता उंच उंच उडत राहा... माझी लहान बहीण." मिस युनिव्हर्स उरुग्वे 2022 कार्ला रोमेरो यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी 'मिस डी आर्मास मी आजपर्यंत भेटलेल्या सर्वात सुंदर महिलांपैकी ती एक होती." अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत 26 वर्षीय शेरीका डी अरमास पहिल्या 30 मध्ये नव्हती. ती या स्पर्धेत स्पर्धा करण्यासाठी फक्त सहा 18 वर्षांच्या मुलींपैकी एक होती. त्यावेळी नेट उरुग्वेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मला नेहमीच मॉडेल व्हायचे होते, मग ते सौंदर्य मॉडेल असो, जाहिरात मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित प्रत्येक गोष्ट आवडते आणि मला वाटते की सौंदर्य स्पर्धांमध्ये, मिस युनिव्हर्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद होत आहे.''
डी आर्मासने तिची स्वतःची मेकअप लाइन देखील सुरू केली
तिने स्वतःची मेक-अप लाइन देखील सुरू केली होती. शे डी आर्मास स्टुडिओ नावाने ती मेकअपशी संबंधित उत्पादने विकायची. एवढंच नाही तर ही मॉडेल पेरेझ स्क्रॅमिनी फाऊंडेशन सोबत देखील काम करायची. हे फाउंडेशन जे कर्करोगाने पीडित मुलांवर उपचार करते. त्यामुळे आता डी आर्मासच्या निधनाने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
