Success Story : हळद लागवड ते पावडर विक्री, दत्तू यांचे स्मार्ट शेती-मॉडेल यशस्वी, उत्पन्न 9 लाख रुपये, Video
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
यंदा त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकाची लागवड केली आहे. हळद शेती ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात.
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गावातील प्रगतशील शेतकरी दत्तू धोत्रे हे 2012 पासून हळदीचे उत्पादन घेत आहेत. यंदा त्यांनी साडेतीन एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकाची लागवड केली आहे. हळद शेती ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करतात. तसेच पाण्याचे ठिबक सिंचनचे नियोजन व्यवस्थापन त्यांनी केलेले आहे. या हळद शेतीतून निघणाऱ्या पिकाचे ते स्वतः हळद पावडर निर्मिती करतात आणि ते उत्पादन बाजारात देखील विक्री करतात. या शेती-व्यवसायाच्या माध्यमातून खर्च वजा करून 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा धोत्रे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली.
हळद लागवड ते थेट विक्री कशी?
हळदीची लागवड ही बेड पद्धतीने करावी लागत असते. बेडमुळे ठिबक अंथरायला सोपे जाते आणि पाणीही व्यवस्थितरित्या झाडांना मिळते. क्षेत्रानुसार शेणखत वापरावे लागते. साडेतीन एकरमध्ये तीन ते चार ट्रॉली शेणखत धोत्रे यांनी वापरले आहे. हळद पिकाचे मध्यभागाचे पाच बाय पाच वर अंतर आहे. इतर कोणतेही रासायनिक खत-औषधे हळदीला लागत नाही.
advertisement
सुरुवातीला 2012 मध्ये दीडशे क्विंटल निघाले होते त्यातले 75 क्विंटल बियाणे विक्री केले आणि उर्वरित 75 क्विंटल सात एकर क्षेत्रात लागवड केली. परंतु तेव्हा भाव घसरले, आमचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्यामुळे बाजारात होतो तेव्हा बघितले हळद पावडरला जास्त भाव आहे. तेव्हापासून विचार केला आपण भाजीपाला विकू शकतो तर हळद पावडर देखील विक्री करू शकतो. तेव्हापासून हळद पावडर स्टॉल लावायला सुरुवात केली आणि यातून नफा देखील जास्त मिळू लागला असल्याचे देखील धोत्रे यांनी सांगितले आहे.
advertisement
उत्पादन आणि उत्पन्न किती?
दरवर्षी दीड ते दोन एकरमध्ये हळद लागवड केलेली असते. सरासरी यातून उत्पादन दीडशे ते दोनशे क्विंटल निघते. तसेच हळकुंड वाळल्यानंतर यामधून 25 ते 30 क्विंटल पावडर काढले जाते. गतवर्षी दीड एकर क्षेत्रामधून साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. तसेच यंदा देखील चांगले पीक बहरलेले आहे. त्यामुळे एकरी 30 क्विंटल उत्पादन होईल आणि खर्च वजा करून 9 लाख रुपये नफा मिळेल.
advertisement
हळद पावडर निर्मितीला यंत्र कोणते आणि कसे?
माझ्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनी देखील हळद शेती केली पाहिजे आणि त्यांना देखील चांगले उत्पन्न मिळावे या हेतूने खिर्डी गावातील संत सावता बचत गटातील शेतकऱ्यांना भेटून त्यांना सांगितले. त्या गटामध्ये सदस्य म्हणून सहभागी झालो. हळद शेती करावी असे देखील सांगितले आणि त्यानंतर कृषी विभाग प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेद्वारे अकरा लाख रुपयांचे यंत्र खरेदी केले. त्यामध्ये गिरणी, ड्राय यंत्र, पॉलिश यंत्र, हळद पेरणी यंत्र यासह विविध प्रकारचे यंत्र खरेदी केले असल्याचे दत्तू धोत्रे सांगतात.
advertisement
हळद शेती इतर शेतकऱ्यांनी करावी का?
नक्कीच इतर शेतकऱ्यांनी देखील हळद शेती करायला हवी तसेच खेडेगावातील 35 ते 40 शेतकऱ्यांनी हळद लागवड करावी असा मानस धोत्रे यांचा आहे. तसेच खुलताबादसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हळद शेती करायला हवी. या शेतीमध्ये स्वतः उत्पादन घेऊन त्याची विक्री केल्यास नक्कीच फायदेशीर ठरते.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 10:27 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : हळद लागवड ते पावडर विक्री, दत्तू यांचे स्मार्ट शेती-मॉडेल यशस्वी, उत्पन्न 9 लाख रुपये, Video









