गौतमी पाटीलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. रिलीज होताच या गाण्याने धुमाकूळ घातलाय. ‘तंबू पिरमाचा पेटला’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं सध्या चांगलंच चर्चेत आलंय.
कधी काळी प्रेमात आकंठ बुडालेली प्राजक्ता माळी, आज 35 व्या वर्षीही सिंगल!
गौतमी पाटीलचं नवं गाणं
‘आंबट शौकीन’ या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटीलचं "तंबू पिरमाचा पेटला" हे ठसकेबाज नवं गाणं सध्या चर्चेत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर राडाच केलाय. आणि लाखोंच्या व्ह्यूजसह युट्यूबवर ट्रेंड करत आहे.
advertisement
संगीतकार साई-पियुष यांच्या चालींनी आणि पियुष कुलकर्णी, ओंकारस्वरूप बागडे आणि अजित विसपुते यांच्या दमदार आवाजांनी गाण्याला भारदस्त साथ दिली आहे. गीतकार संदेश राऊत यांच्या शब्दांमध्ये लावणीचा पारंपरिक बाज असूनही आजच्या तरुणाईला भिडेल अशी झिंग आहे. तर नृत्यदिग्दर्शक राहुल ठोंबरे यांनी गौतमीच्या अंगभूत लावणीला साजेसे नृत्य देऊन हा सोने पे सुहागा क्षण बनवला आहे.
दरम्यान, १३ जूनला प्रदर्शित होणाऱ्या ‘आंबट शौकीन’ मध्ये मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि नवोदित चेहऱ्यांचा झगमगाट आहे. पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, अमेय वाघ यांच्यासह आणखी अनेक कलाकार. निखिल वैरागर यांची कथा आणि दिग्दर्शन, आणि अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे संवाद, हे सगळं मिळून सिनेमात विनोद, गोंधळ, आणि नृत्याची फोडणी घालणार आहेत.