TRENDING:

Allu Arjun : ...त्याचं चुकलंच, अल्लू अर्जुन प्रकरणी पवन कल्याण थेटच बोलले, दिली मुख्यमंत्र्यांना साथ

Last Updated:

Allu Arjun : अल्लू अर्जुनवर केलेल्या कायदेशीर कारवाईला तेलंगणा पोलिस जबाबदार नसल्याचे पवन यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तेलुगू सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल' च्या प्रीमियर रिलीज दरम्यान संध्याकाळी थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अल्लू अर्जुनवर केलेल्या कायदेशीर कारवाईला तेलंगणा पोलिस जबाबदार नसल्याचे पवन यांनी सांगितले. कायदा सर्वांसाठी समान असून, पोलिसांनी जनतेच्या सुरक्षेचे भान ठेवून काम केले पाहिजे. अल्लू अर्जुनने आधी मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घ्यावी, असे ते म्हणाले. इतकंच नाही, तर पवन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. रेवंत रेड्डी यांचे कौतुक केले आणि त्यांना महान नेता म्हटले.
अल्लू अर्जुनवर केलेल्या कायदेशीर कारवाईला तेलंगणा पोलिस जबाबदार नसल्याचे पवन यांनी सांगितले.
अल्लू अर्जुनवर केलेल्या कायदेशीर कारवाईला तेलंगणा पोलिस जबाबदार नसल्याचे पवन यांनी सांगितले.
advertisement

अनौपचारिक संभाषणात मंगळागिरी येथे पत्रकारांशी बोलताना पवन कल्याण म्हणाले, “कायदा सर्वांसाठी समान आहे आणि अशा घटनांमध्ये मी पोलिसांना दोष देत नाही, ते सार्वजनिक सुरक्षा लक्षात घेऊन काम करतात. थिएटर कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला कोणत्याही समस्येबद्दल आधीच माहिती द्यायला हवी होती. एकदा तो आसनावर बसला की, गरज भासल्यास जागा रिकामी करण्याची सूचना द्यायला हवी होती.”

advertisement

'अनुपमा'ची तुलना थेट B Grade फिल्मशी, मालिकेतील 'त्या' सीन्समुळे पेटलं वातावरण, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं 

पवन कल्याण हे अल्लू अर्जुनचे नातेवाईक आहेत. अल्लू अर्जुनची आत्या सुरेखा हिचे लग्न सुपरस्टार चिरंजीवीसोबत झाले आहे, जो पवन कल्याणचा मोठा भाऊ आहे. पवन म्हणाले, “अल्लू अर्जुनच्या टीमधील कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला आधी भेटले असते तर बरे झाले असते. या घटनेत रेवतीचा मृत्यू झाल्याने मला धक्का बसला आहे. अल्लूचा प्रत्यक्ष हात नसला तरी त्याने आधीच सांगायला हवे होते की तो पीडितेच्या कुटुंबाला आधार देत आहे. चुकीबद्दल खेद व्यक्त करायला हवा होता.

advertisement

पवन कल्याण म्हणाले, “या प्रकरणात थेट माणुसकीचा अभाव दिसला. सर्वांनी रेवतीच्या घरी जाऊन तिचे सांत्वन करायला हवे होते. अल्लूच्या कमतरतेमुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे." मात्र, त्यांनी समतोल साधला आणि सिनेमा हा सामूहिक प्रयत्न असल्याचे सांगितले. या घटनेसाठी अल्लू अर्जुनला जबाबदार धरणे योग्य नाही.

४ डिसेंबरला अल्लू अर्जुन हा त्याचा 'पुष्पा 2' चित्रपट प्रदर्शित होत असलेल्या थिएटरमध्ये गेला होता. अल्लू आल्याने गोंधळ उडाला. या घटनेत रेवती या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर लगेचच हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करून काही वेळाने जामीन मंजूर झाला.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Allu Arjun : ...त्याचं चुकलंच, अल्लू अर्जुन प्रकरणी पवन कल्याण थेटच बोलले, दिली मुख्यमंत्र्यांना साथ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल